सर्वोच्च न्यायालय, अलाहाबाद उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.File Photo
Published on
:
19 Nov 2024, 1:21 pm
Updated on
:
19 Nov 2024, 1:21 pm
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालय, प्रयागराज रेल्वे स्थानक, अलाहाबाद उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष आशुतोष पांडे आणि जन्मभूमी-शाही ईदगाह प्रकरणी खटला दाखल करणाऱ्या व्यक्तीच्या व्हॉट्सॲपवर धमकीचा संदेश आला आहे.
मंगळवारी, मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयातही सुनावणी झाली. त्यापूर्वी सोमवारी रात्री उशीरा हा धमकीचा संदेश आला. आशुतोष पांडे यांनी दावा केला आहे की, हा धमकीचा संदेश पाकिस्तानातून आला आहे. सोमवारी, रात्री दीडच्या दरम्यान व्हॉट्सॲपवर पाकिस्तानी नंबरवरून ६ धमकीचे संदेश आले असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर २.३६ वाजता व्हॉट्सॲप कॉलद्वारे धमकी देण्यात आली. श्रीकृष्ण जन्मभूमी शाही ईदगाह प्रकरणात आशुतोष पक्षकार आहेत. ते श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टचे अध्यक्षही आहेत.