साक्रीत महायुतीच्या मंजुळा गावित विजयी
Published on
:
23 Nov 2024, 9:40 am
Updated on
:
23 Nov 2024, 9:40 am
धुळे | धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी विजयी आघाडी घेतली आहे. विशेषता साक्री विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर पडलेल्या महायुती तथा शिवसेनेच्या आमदार मंजुळाताई गावित या 4800 मतांनी विजयी झाल्या आहे.
धुळे शहर विधानसभा मतदारसंघात 17 फेरी अखेर भारतीय जनता पार्टीचे अनुप अग्रवाल यांनी 87660 मते मिळवली आहे .तर महाविकास आघाडीचे अनिल गोटे यांनी 19917 तसेच एम आय एम चे फारुक शाह यांनी 63907 मते मिळवली आहेत. भाजपचे अग्रवाल यांनी 23753 मतांची विजयी आघाडी घेतली आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी तथा काँग्रेसचे उमेदवार आमदार कुणाल पाटील हे पराभवाच्या छायेत आहेत. भारतीय जनता पार्टीचे राम भदाणे यांनी त्यांच्यावर 47 हजार 210 मतांची विजयी आघाडी मिळवली आहे. 19 व्या फेरी अखेर भदाणे यांनी एक लाख 17 हजार 129 तर कुणाल पाटील यांनी 69 हजार 919 मते मिळवली आहे. तिकडे शिंदखेडा मतदारसंघात 21 व्या फेरी अखेर आमदार तथा भाजपाचे उमेदवार जयकुमार रावळ यांनी एक लाख 32 हजार 71 मते मिळवली आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप बेडसे यांना 50207 मते मिळाली आहेत .आमदार रावळ यांना 21 व्या फेरी अखेर 81864 मतांची आघाडी आहे.