Tourism Projects | सिंधुदुर्गला साकारणार अंडर वॉटर म्युझियम, पाणबुडी पर्यटनFile Photo
Published on
:
30 Nov 2024, 6:48 am
Updated on
:
30 Nov 2024, 6:48 am
मुंबई/सिंधुदुर्ग/नाशिक : Tourism Projects in Maharashtra | विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर केंद्रातील भाजप सरकारने महाराष्ट्राला घवघवीत निधीचे गिफ्ट दिले आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी विशेष साहाय्य योजनेंतर्गत सिंधुदुर्गमध्ये अंडर वॉटर म्युझियम, आर्टिफिशियल रिफ आणि पाणबुडी पर्यटनासाठी ४६ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे; तर नाशिक येथील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदाघाट परिसरात 'राम काल पथ' उभारण्यासाठी ९९ कोटी १४ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर केले आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत याबाबत घोषणा केली आहे.
Tourism has the potential to bring prosperity to the lives of many. Our Government will keep focussing on enhancing India’s tourism infrastructure to ensure more people can experience the wonders of #IncredibleIndia. https://t.co/Bnssm1zkwD
— Narendra Modi (@narendramodi) November 29, 2024फडणवीस यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
नाशिक आणि सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष आभार मानले आहेत. 'एक्स' वर केलेल्या पोस्टमध्ये फडणवीस म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून चमकण्यासाठी चालना मिळणार आहे. राज्यातील पर्यटन प्रकल्पामुळे स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होण्याबरोबरच रोजगारालाही चालना मिळणार आहे.
Maharashtra tourism gets boost !
Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji and efforts of Union Minister Gajendra Singh Shekhawat ji, Maharashtra gets boost to shine on global tourism map with groundbreaking projects:
▪️Ex INS Guldar Underwater Museum, Artificial… pic.twitter.com/y5sPPUZzqW