सिद्धिविनायक न्यासाची नवी समिती जाहीरFile Photo
Published on
:
27 Sep 2024, 6:59 am
Updated on
:
27 Sep 2024, 6:59 am
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
सिद्धिविनायक न्यासाची नवी समिती जाहीर करण्यात आली आहे. या समितीत १० जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भाजपच्या पवन त्रिपाठी यांची कोषाध्यक्ष पदी वर्णी लागली आहे.
भाजपकडून गोपाळ दळवी, भास्कर शेट्टी, जितेंद्र राऊत आणि महेश मुदलियार हे सदस्यपदी तर शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्येष्ठ नेत्या मीना कांबळी व राहुल लोंढे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मनीषा तुपे, भास्कर विचारे आणि सुदर्शन सांगळे यांना संधी देण्यात आली. महायुतीकडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख पदाधिकाऱ्यांना बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.