सिल्लोडमधून शिंदे गटाचे अब्दुल सत्तार सलग चौथ्यांदा विजयी:ठाकरे गटाचे सुरेश बनकर यांचा 2 हजार 420 मतांनी केला पराभव

2 hours ago 1
सिल्लोड मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी चौथ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश बनकर यांचा पराभव केला. दोन्ही उमेदवारांमध्ये अखेरच्या फेरीपर्यंत चुरस होती. काही फेऱ्या अब्दुल सत्तार आघाडी घेत होते, तर काही फेऱ्यांमध्ये सुरेश बनकर आघाडी घेत होते. अखेर अब्दुल सत्तार यांनी 2 हजार 420 मतांनी विजय मिळवला. सत्तार यांना 1 लाख 37 हजार 960 मते मिळाली तर सुरेश बनकर यांना 1 लाख 35 हजार 540 मते पडली. एकेकाळी अब्दुल सत्तार हे काँग्रेसमध्ये असताना सिल्लोड विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. अब्दुल सत्तार यांनी याआधी सिल्लोड मतदारसंघातून तीन वेळा विजय मिळवत हॅट्रिक केलेली आहे. त्यांनी 2009 आणि 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत विधानसभा गाठली होती. त्यानंतर 2019 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तेव्हाही त्यांनी भरघोस मतांनी विजय मिळवला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती . त्यावेळीही त्यांच्या विरोधात भाजपने सुरेश बनकर यांना रिंगणात उतरवले होते. तर 2019 च्या विधानसभेत अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात माणिकराव पालोदकर यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरले होते. 2014 आणि 2019 मध्ये अब्दुल सत्तार यांनी मोठा विजय मिळवला होता. शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सिल्लोड मतदारसंघात मत विभागण्याचे मोठे आव्हान अब्दुल सत्तार यांच्यासमोर होते. हे ही वाचा... काँग्रेस 63 वरून 16वर, भाजपची 79 वरून 132वर झेप:महाराष्ट्र निवडणुकीत ठाकरे व शरद पवार कसे बाजूला झाले; लोकसभेनंतर परिस्थिती बदलणारे 5 घटक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय अभूतपूर्व आहे. भाजपने एकूण 149 जागांवर निवडणूक लढवली आणि 132 जागांवर आघाडीवर आहे. म्हणजे स्ट्राइक रेट 86% आहे. यासह महाराष्ट्रात भाजपचा अश्वमेध यज्ञ पूर्ण झाला. सविस्तर वाचा... राज्यातील निकालावर आमचा विश्वास नाही:काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा आरोप; अभ्यास करून नंतर जनतेसमोर जाणार राज्यातील काँग्रेसच्या 100% जिंकून येणाऱ्या उमेदवारांचा पराभव कसा होऊ शकतो? असा प्रश्न काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राच्या जनतेवर आमच्या विश्वास आहे. त्यामुळे या निकालावर आमचा विश्वास नसल्याचे त्यांनी त्यांनी म्हटले आहे. हा निकाल अनपेक्षित आहे. कुणालाच त्यावर विश्वास बसत नसल्याचा दावा देखील त्यांनी केला. सविस्तर वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article