सुनील केदार पत्नीला विजय मिळवून देण्यात अपयशी:आशिष देशमुखांनी दिला धक्का

2 hours ago 1
जिल्ह्यातील दिग्गज नेते आणि महाविकास आघाडीला एकहाती रामटेक लोकसभा मतदारसंघत जिंकून देणारे, माजी मंत्री सुनील केदारांना सावनेर विधानसभा मतदारसंघात आपल्याच पत्नीला निवडून आणता आले नाही. महाविकास घाडीच्या उमेदवार अनुजा केदार यांना भाजप महायुतीचे आशिष देशमुख यांनी समारे २० हजार मतांच्या फरकांनी पराभवचा धक्का दिला आहे. २४ डिसेंबर २०२३ ला सुनील छत्रपाल केदार यांना महाराष्ट्र विधानसभेतून अपात्र ठरवण्यात आल्याने सावनेर विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला. त्यानंतर त्यांनी या मतदारसंघातून पत्नी अनुजा केदार यांना उभे केले होते. भाजपचे आशिष देशमुख विरोधात उभे होते. २१ व्या फेरी अखेर आशिष देशमुख २२०९९ मतांनी पुढे होते. देशमुख यांना ९४,६५० तर अनुजा केदार यांना ७२,५५१ मते होती. इतका फरक त्या भरून काढणार नाही असे दिसून आले. या पराभवामुळे सुनील केदार यांची दादागिरी संपुष्टात आली आहे. सावनेर मतदारसंघाची संपूर्ण राज्यात चर्चा होती. २०१४ मध्ये देशमुख काका-पुतण्यांनी निवडणूक गाजवली होती. यावेळी भाजपचे उमेदवार आशिष देशमुख यांच्या विरोधात त्यांचे सख्खे भाऊ डॉ. अमोल देशमुख रिंगणात उतरले होते. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. तर, काँग्रेसकडून नेते सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार या लढत होत्या. त्यांच्या विजयासाठी केदार यांनी संपूर्ण ताकद लावली होती. मात्र त्यांना यश आले नाही. जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात शिक्षा झाल्याने सुनील केदार यांना निवडणूक लढवता आली नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नी अनुजा केदार यांना काँग्रेसने तिकीट दिली होती. तर, सुनील केदार यांचे साम्राज्य हलवण्यासाठी भाजपने आशिष देशमुख यांना पुन्हा एकदा संधी दिली होती. या संधीचे देशमुख यांनी साेने केले. आशिष देशमुख यांनी २०१४च्या निवडणुकीत काटोलमध्ये जाऊन आपले काका अनिल देशमुख यांचासुद्धा धक्कादायक पराभव केला होता. नागपूर जिल्ह्यात सर्व सूत्रे केदारांनी आपल्या हाती घेतली होती. उमेदवारसुद्धा मीच ठरवणार असे ते सांगत होते. रामटेकमध्ये काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक यांचा त्यांनी उघडपणे प्रचार केला होता. हिंगणा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश बंग यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यास दबाव टाकला होता. त्यामुळे काँग्रेसचेसुद्धा केदारांच्या दादागिरीला कंटाळले होते. अनुजा केदार यांचा पराभव करून सर्वांनी केदारांना धडा शिकवला असल्याचे बोलले जाते. सावनेर विधानसभा एकूण मतदात ६८.८३ टक्के पुरुष ७०.८५ टक्के| महिला ६६.७९ टक्के

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article