प्राथमिक मतमोजणीत राज्यात महायुतीने १४५ जागांवर आघाडी घेतली आहे.(file photo)
Published on
:
23 Nov 2024, 4:55 am
Updated on
:
23 Nov 2024, 4:55 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील विधानसभेच्या (Maharashtra Election Result 2024) २८८ जागांचे निकाल आज शनिवारी जाहीर होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, प्राथमिक मतमोजणीत राज्यात महायुतीने (Mahayuti) १४५ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यात भाजप ९०, शिंदेंची शिवसेना ४९, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने ३२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) ४७ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना १८, काँग्रेस १७ आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष १२ जागांवर आघाडीवर आहे. इतर आणि अपक्ष मिळून १८ जागांवर आघाडीवर आहेत.