पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील मतदारांना आवाहन. File Photo
Published on
:
23 Nov 2024, 11:38 am
Updated on
:
23 Nov 2024, 11:38 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांवर महायुतीने निर्णायक आघाडी घेतली आहेत. तर राज्यात १३० जागांवर भारतीय जनता पक्षाने एकहाती पक्कड घेतली आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
एकात्मतेची उंची आणखी उंच करू; मोदींचे आवाहन
पीएम मोदी यांनी एक्स (X) पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "महाराष्ट्रातील विजय हा विकासाचा आणि सुशासनाचा विजय आहे". तसेच आपण एकात्मतेची उंची आणखी उंच करू असे आवहन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.
Development wins!
Good governance wins!
United we will soar even higher!
Heartfelt gratitude to my sisters and brothers of Maharashtra, especially the youth and women of the state, for a historic mandate to the NDA. This affection and warmth is unparalleled.
I assure the…
— Narendra Modi (@narendramodi) November 23, 2024राज्यातील तरुण आणि महिलांचे मानले विशेष आभार !
एनडीएला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातील भगिनी आणि बांधवांचे, विशेषतः राज्यातील तरुण आणि महिलांचे मनःपूर्वक आभार. ही आपुलकी आणि जिव्हाळा अतुलनीय आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमची आघाडी कार्यरत राहील, याची मी जनतेला ग्वाही देतो. जय महाराष्ट्र!, असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.