मविआचे सरकार आले तर सोयाबीनला ७००० रुपये भाव देऊ, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले आहे. पण काँग्रेसचीच सत्ता असलेल्या कर्नाटक राज्यात फक्त ३८०० रुपये भाव दिला जात आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी आर्वी येथील प्रचारसभेत केला. सोयाबीनच्या भावात काँग्रेसचं आवतण लबाडीचं आहे, असेही ते म्हणाले. सोयाबीनच्या हमीभावावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू असलेला वाद प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही सुरू होता. आर्वी येेथील सभेत फडणवीस म्हणाले की, कालपरवा राहुल गांधी आले होते. त्यांनी म्हटलं की त्यांचं सरकार आलं तर सोयाबीनला सात हजार रुपयांचा भाव देऊ. त्यानंतर मी थेट काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कर्नाटक राज्यातील गावात फोन केला आणि विचारलं तुमच्याकडे सोयाबीनचा दर काय? तेव्हा मला माहिती मिळाली की ३८०० रुपये आहे. त्यामुळे लक्षात ठेवा लबाडाचं अावतण जेवल्याशिवाय खरं नसतं. हे काँग्रेसचे लोक खोटे आहेत. निवडणुकीपुरतं आश्वासन देतात आणि निवडणुकीनंतर त्यांची आश्वासनं संपून जातात. लाडकी बहीणच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली होती, असेही फडणवीस म्हणाले. नमो किसान : १५ हजार रुपये देऊ फडणवीस असेही म्हणाले की, पुन्हा शेतकऱ्यांचा आशीर्वाद मिळाला तर नमो किसान योजनेतून १२ हजार नाही तर १५ हजार रुपये देणार आहोत. तसेच हमीभावापेक्षा जेव्हा जेव्हा कमी भाव शेतकऱ्यांना मिळेल तेव्हा दोन्हीमधला फरक आमचं सरकार देईल.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)