सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर:राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप यांची पोलिसांकडे तक्रार
2 days ago
1
सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी हडपसर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी एका संशयित आरोपी विरुद्ध कोंढावा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यानंतर याबाबत पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अझहर तांबाेळी आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रशांत सुदामराव जगताप (वय ४७, रा. अनुसया निवास, वानवडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हडपसर विधानसभा मतदार संघातून जगताप आघाडी कडून निवडणूक लढवत आहेत. अझहर तांबोळी आणि साथीदारांनी सोशल मीडियावर जगताप यांच्याविरुद्ध बदनामीकारक मजकूर प्रसारित केला. तांबोळी आणि साथीदारांनी दिशाभूल करणारा संदेश प्रसारित केल्याचे जगताप यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक एस बेंद्रे पुढील तपास करत आहेत. चंद्रकांत टिंगरे यांना मारहाण प्रकरणी पोलिसांकडून गु्न्हा दाखल वडगाव शेरीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बापू पठारे यांना पाठिंबा दिल्याने माजी नगरसेविका रेखा टिंगेर यांचे पती चंद्रकांत यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. टिंगरे यांना मारहाण करणाऱ्या दोघांनी मोटारीवर दगडफेक करुन नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत चंद्रकांत टिंगरे यांच्या पत्नी रेखा (वय ५२, रा. कमल निवास, भैरवनगर, धानोरी ) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माझे पती चंद्रकांत टिंगरे यांनी आठ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून (अजित पवार गट) शरद पवार गटात प्रवेश केला. वडगाव शेरीतील उमेदवार बापू पठारे यांना पाठिंबा दिल्याने विरोधक आमच्यावर चिडून होते. चंद्रकांत टिंगरे मंगळवारी दुपारी धानोरी भागातून निघाले होते. त्यावेळी दोघांनी मोटार अडविली. मोटारीवर दगडफेक करुन पती चंद्रकांत यांना मारहाण केली, असे रेखा टिंगरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. टिंगरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार गट) यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली होती. पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड तपास करत आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)