हुरुनने ओळखले 150 उद्योजक, यांचा व्यवसाय 5 कोटी डाॅलरवर:35 वर्षांपेक्षा कमी वयाचे देशातील अव्वल उद्योजक... 31 वर्षीय अंकुश टॉपवर; 7 महिलांत ईशा अंबानी

2 hours ago 1
हुरुन इंडियाने प्रथमच ३५ वर्षांखालील भारतीय उद्योजकांवर केंद्रित यादी जारी केली. यात ३५ आणि यापेक्षा कमी वयाच्या १५० उद्योजकांचा समावेश असून त्यांच्या व्यवसायाचे किमान मूल्यांकन ५ कोटी डॉलर (४१५ कोटी रुपये) आहे आणि ते भविष्यातील बिझनेस लीडर आहेत. हुरुनचे म्हणणे आहे की, निव्वळ संपत्तीच्या बाबतीत हे उद्योजक कमी वयातच कोट्यवधींचे मालक आहेत.यादीत शेअरचॅटचे संस्थापक अंकुश सचदेवा अव्वल स्थानी आहेत. ३१ वर्षीय अंकुश सर्वात तरुण उद्योजकही आहेत. महिलांमध्ये टीचिंग अँड लर्निंग प्लॅटफॉर्म टॉडलच्या संस्थापिका परिता पारेख सर्वात युवा उद्योजिका (३२ वर्षे) आहेत. यादीत मुकेश अंबानी यांची ३२ वर्षीय जुळी मुले ईशा आणि आकाश अंबानी अनुक्रमे ३१ व ३२ व्या स्थानी आहेत. यादीत दुसऱ्या स्थानी स्मार्टवर्क्सचे नितीश शारदा आहेत. त्यानंतर गोल्डमेडल इलेक्ट्रिकल्सचे अक्षित जैन, बिझनेसचे चैतन्य राठी, बीजी श्राइक कन्स्ट्रक्शनचे जय विजय शिकरे आहेत. यादीत एकूण ७ महिला आहेत. पैकी ४ कुटुंबाचा वारसा पुढे नेत आहेत. सैनी, हिमेशचे जास्त फॉलोअरगणेश हाऊसिंगच्या अनेरी पटेल, यूएसव्हीच्या अनिशा तिवारी, एन्कॉर हेल्थकेअरच्या अंजली मर्चंट, ट्राया हेल्थच्या सलोनी आनंद व ममा अर्थच्या गजल अलघ यांचेही नाव आहे. अनअकॅडमीचे रोमन सैनी, हिमेश सिंह यांचे सर्वाधिक फॉलोअर (१०.९५ लाख) आहेत. त्यानंतर मिशोचे विदित अत्रे (९.३४ लाख) आहेत.प्रसिद्ध कूक एफएमचे विनोद कुमार मीणा (१३ रँक), जय किसानचे अर्जुन अहलुवालिया (१४), पॉकेट एफएमचे रोहन नायक (१९), अपार इंडस्ट्रिजचे ऋषभ देसाई (२१), फिजिक्सवालाचे अलख पांडे (२३), स्पिनीचे रामांशू माहौर (२६) यांचीही नावे समाविष्ट आहेत. यादीत १२३ सेल्फमेड आंत्रप्रेन्योर आहेत. त्यांचे यादीतील सहभागाचे प्रमाण ८२ टक्के आहे.हे सर्व आंत्रप्रेन्यूर देशातील ४१ शहरांतील आहेत. बंगळुरूतून सर्वाधिक २९, मुंबईचे २६ आहेत. यादीत महाराष्ट्राचे ३३, पुण्याचे ५ उद्याेजक - नाशिकचे अजिंक्य कुलकर्णी ४७ व्या स्थानी वित्तीय सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या विंट वेल्थचे सहसंस्थापक अजिंक्य कुलकर्णी (३३) हे नाशिकचे आहेत. अजिंक्य यांनी ‘विंट वेल्थ’ या पोर्टलद्वारे गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या यादीत महाराष्ट्राचे एकूण ३३ आंत्रप्रेन्युअर्स आहेत.त्यात पुण्याचे ५ तर नाशिकच्या एका उद्योजकाचा समावेश आहे. उर्वरित मुंबईचे आहेत. पुण्याचे उद्याेजक...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article