हे एखादे षडयंत्र तर नाही ना? देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड; चित्रा वाघ यांचा इशारा कुणाकडं?

2 hours ago 1

Devendra Fadnavis Office Vandalized : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याचे समोर आल्यानंतर आता त्यावर विरोधकांसह सत्ताधारी एकमेकांवर तुटून पडले आहेत. भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हे एखादे षडयंत्र तर नाही ना? देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड; चित्रा वाघ यांचा इशारा कुणाकडं?

हे षडयंत्र तर नाही ना?

| Updated on: Sep 27, 2024 | 4:24 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात घुसून एका महिलेने तोडफोड केली. घोषणाबाजी करत तिने फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर लावलेला त्यांचा नाम फलक सुद्धा उखडून फेकून दिला. ही महिला मंत्रालयात विनापास घुसल्याचे समोर आल्याने विरोधकांनी एकच गोंधळ घातला. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये या मुद्यावरून शा‍ब्दिक चकमक झडली. आता भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हे षडयंत्र तर नाही ना ?

हे सुद्धा वाचा

हे एखादे षडयंत्र तर नाही ना? राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात घुसून एका महिलेने केलेल्या तोडफोडीची सखोल चौकशी व्हावी, तिच्यामागे नेमके कोण आहे, हे उघड व्हायलाच हवं. सर्वात प्रथम या महिलेची मानसिकता काय आहे हे तपासून तिने केलेले कृत्य कशासाठी केले.? यामागील षडयंत्र काय आणि कोणाचे हे पाहायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article