भटक्या श्वानाने अचूक वाट दाखवत सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यास मदत केल्याचा व्हिडिओ ब्रिटीश गिर्यारोहकाने शेअर केला आहे.(Image source-Instagram )
Published on
:
20 Nov 2024, 6:35 am
Updated on
:
20 Nov 2024, 6:35 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : पेरूच्या पर्वतरांगांमध्ये तो गिर्यारोहणासाठी गेला. समुद्रसपाटीपासून १५ हजार फूटांवर ज्या ग्रुपबरोबर गिर्यारोहणासाठी गेला होता त्यांच्यापासून तो वाट चुकला. सर्वत्र दाट बर्फ आणि धुक्याने वेढलेला पर्वतरांगांमध्ये तो एकटाच राहिला. 'आता सारं काही संपलं,' असे क्षणभर त्याच्या मनातही आलं. 'पुढे कसं होणार?' या प्रश्नाने त्याला नैराश्यानेही घेरलं; पण अचानक एक भटके श्वान त्याच्यासमोर येवून उभे राहिले. त्याच्यासाठी ते देवदूतच ठरलं! कारण याच भटक्या श्वानाने त्याला अचूक वाट दाखवत सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यास मदत केली. त्याने हा स्वप्नवत प्रवास आपल्या मोबाईल कॅमेर्यामध्ये चित्रीत केला. सुरक्षित स्थळी पोहचल्यानंतर पेरुच्या पर्वतरागांमधील आपला 'अविस्मरणीय' प्रवास ब्रिटीश गिर्यारोहकाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा हृदयस्पर्शी VIDEO मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ७० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून, त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
पर्वतरांगांमध्ये १५ हजार फुटांवर असताना वाट चुकला
पेरूच्या पर्वतरांगांमध्ये इग्नेलस टेकडीच्या माथ्यावर ट्रेकिंग करताना एका ब्रिटिश पर्यटकाचा वाट चुकला. तो आपल्या ग्रुपपासून वेगळा झाला. १५ हजार फूट उंच पर्वतरांगांवर तो एकटाच राहिला. 'पुढे कसं होणार?' या प्रश्नाने त्याला नैराश्यानेही घेरलं; पण अचानक एक भटके श्वान त्याच्यासमोर येवून उभे राहिले. अचानक एक भटका कुत्रा देवदूताच्या रूपात त्याच्याकडे आला. सोशल मीडिया हँडलवर एल ग्युरो इंग्लस किंवा द ब्लाँड इंग्लिशमन अशी ओळख असणार्या गिर्यारोहकाने हा हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे.
Pudhari
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, इग्नेलस टेकडीच्या माथ्यावर आपला मार्ग गमावल्यानंतर एक कुत्रा त्याच्या दिशेने येताना दिसतो. पाहून खूप अस्वस्थ आणि निराश झाला होता. व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल की, कुत्र्यालाही हायकरचा रस्ता चुकल्याची जाणीव झाली असेल. यानंतर तो त्या व्यक्तीला एका अरुंद वाटेकडे घेऊन जातो. व्हिडिओच्या शेवटी, श्वान पुंटा युनियन पासच्या चिन्हाजवळ उभा राहून हायकरची वाट पाहत असल्याचे दिसून येते. यानंतर हे श्वान गिर्यारोहकाला रस्ता दाखताना दिसते.
मी श्वानावर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला
'डेली मेल'शी बोलताना ब्रिटीश गिर्यारोहक म्हणतो, " मी पर्वतरांगांमध्ये १५ हजार फुटांवर असताना वाट चुकली. यावेळी माझयासमोर एक श्वान घेवून थांबले. मी श्वानाच्या पर्वताच्या ज्ञानावर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला. श्वानाला कोणत्याही नकाशांपेक्षा वळणाचे मार्ग चांगले कसे कळतात हे पाहून आश्चर्य वाटले."
व्हायरल व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस
@Rainmaker1973 हँडलवर हा व्हिडिओ शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 70 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अनेक युजर्सनी त्यांचे गिर्यारोहणाचे अनुभवही शेअर केले आहेत. रशियामध्ये हायकिंग करताना त्याच्यासोबत असेच काहीसे घडल्याचे एका यूजरने म्हटलं आहे. एका युजरने म्हटलं आहे की, तो तुमच्यासाठी देवदूत बनून आला होता.