5 महिन्यांत 6 रुग्णांवर नि:शुल्क मूत्रपिंड प्रत्यारोपण:शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालय ठरत आहे मूत्रपिंड रुग्णांसाठी वरदान

2 hours ago 1
शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल मागील काही वर्षांपासून मुत्रपिंडाचा आजार असलेल्या जिल्ह्यातील रुग्णांसाठी वरदान ठरले आहे. या ठिकाणी रुग्णांवर पूर्णत: नि:शुल्क उपचार केले जातात. त्यामुळे बहुतांश गरजू, गरीब, आदिवासी रुग्णांची सोय झाली आहे. मागील पाच महिन्यांत ६ रुग्णांवर नि:शुल्क मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले असून मुत्रपिंडासंदर्भात व्याधी असलेल्या ४९१५ रुग्णांचे डायलिसिस करण्यात आले. बदलत्या जीवनशैलीमुळे शहरी व ग्रामीण भागात मुत्रपिंडांच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. अशा रुग्णांना सुमारे पाच वर्ष आधीपर्यंत इतर महानगरांकडे किंवा खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी धाव घ्यावी लागत होती. येथे सातत्याने रुग्णांवर मूत्रपिंड प्रत्यारोपण केले जात असून आजवर १०० वर रुग्णांना त्यांच्या जवळच्या नात्यातील व्यक्तीचे एक मूत्रपिंड बसवून नवजीवन देण्यात आले आहे. काहींना पत्नीने, काहींना पतीने, काही रुग्णांना आईने तर काही रुग्णांना बहिण व भावाने मूत्रपिंड दिल्याची उदाहरणे आहेत. मूत्रपिंड प्रत्यारोपण केल्याशिवाय त्या रुग्णाचा प्राण वाचवणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतरच त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली जाते. त्यानंतर त्यांचे समुपदेशनही केले जाते. यामुळे १०० वर मुत्रपिंडाचा गंभीर आजार असलेल्या रुग्ण आता व्यवस्थित जीवन जगत आहेत. केवळ मुत्रपिंडावरच नव्हे तर हृदयावरही मोठ्या शस्त्रक्रिया एव्हाना सुपर स्पेशालिटीत होऊ लागल्या आहेत. तसेच वाढीव खाटांचीही येथे सोय करण्यात आली आहे. आता तर दुसरी कॅथलॅबही सुपर स्पेशालिटीला शासनाने मंजूर केली आहे. मुत्रपिंड आणि हृदयाच्या शस्त्रक्रियेची संपूर्ण सोय ^सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये मुत्रपिंडाच्या आजारावरील उपचार, प्रत्यारोपण, हृदयाच्या आजारावरील उपचार, अँजिओप्लास्टी करणारे तज्ज्ञ डॉक्टर तसेच कॅथलॅब उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही अडचणींशिवाय शस्त्रक्रिया करता येत आहेत. - डॉ. अमोल नरोटे, अधीक्षक, सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article