आपण केलेल्या चांगल्या कामाची ही पावती: मालती शेळके
बुलडाणा (Banko Blue Ribbon Award) : राजर्षी शाहू मल्टिस्टेटला सहकारातील मानाचा “बँको ब्लू रिबन २०२४” (Banko Blue Ribbon Award) हा पुरस्कार सलग दुसऱ्यांदा मिळाला. लोणावळा येथील ॲम्बी व्हॅली सिटीमध्ये गुरुवार २९ जानेवारी रोजी आयोजित समारंभात हा पुरस्कार माजी सहकार आयुक्त श्री. दळवी यांच्याहस्ते स्वीकारला. आपण केलेल्या चांगल्या कामाची पावती मिळाल्याचा आनंद आहे. संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार, संचालक, कर्मचारी, दैनिक प्रतिनिधी व हितचिंतक यांना हा पुरस्कार समर्पित करते, असे पुरस्कार स्वीकारल्यानंतर संस्थाध्यक्ष मालती संदीप शेळके यांनी सांगितले.
अविज पब्लिकेशन कोल्हापूर आणि गॅलेक्सी इन्मा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ते ३१ जानेवारी रोजी बँको पतसंस्था सहकार परिषद २०२५ व (Banko Blue Ribbon Award) बँको पतसंस्था ब्लू रिबन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात राज्यभरातील बँकिंगमधील तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
आपल्या भावना व्यक्त करताना संस्थाध्यक्ष मालती संदीप शेळके म्हणाल्या की, आमचे आधारवड भाऊसाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोत्तम बँकिंग सेवा देण्यासह सामाजिक उपक्रम राबवण्यास (Rajarshi Shahu Multistate) ‘राजर्षी शाहू मल्टिस्टेट’ कटिबद्ध आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल व उच्चशिक्षित मनुष्यबळ, प्रशस्त इमारत, कामाच्या ठिकाणी असलेली प्रसन्नता आणि शुभचिंतकांचे आशीर्वाद यामुळे राज्य आणि राज्याबाहेर संस्थेची यशस्वी घोडदौड सुरु आहे. सहकारातील अनेक नामांकित पुरस्कार संस्थेला मिळाले आहेत. काल लोणावळा येथे सलग दुसऱ्यांदा (Banko Blue Ribbon Award) “बँको ब्लू रिबन २०२४” पुरस्कार मिळाला असल्याचे ते म्हणाले.
यावेळी (Banko Blue Ribbon Award) बँको अविज पब्लिकेशनचे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे-गुंडाळे, अशोक नाईक संचालक, गॅलेक्सी इनमा. पुणे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. संदीपजी शेळके तसेच बँकिंग क्षेत्रातील तज्ञ आणि दिग्गज व्यक्ती, विविध संस्थांचे वरिष्ठ संचालक मंडळी आदी उपस्थित होते.