Bigg Boss 18 Winner Karanveer Mehra: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करणवीर मेहराने बिग बॉसच्या अठराव्या सिझनचं विजेतेपद पटकावलं आहे. विवियन डिसेना आणि करणवीर यांच्यात अंतिम चुरस रंगली होती. अखेर करणवीरने यात बाजी मारली आहे.
करणवीर मेहराImage Credit source: Instagram
‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला असून करणवीर मेहराने विजेतेपद पटकावलं आहे. 105 दिवसांच्या खेळानंतर अखेर या सिझनचा विजेता सूत्रसंचालक सलमान खानने जाहीर केला. यंदाच्या सिझनमध्ये 23 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी विवियन डिसेना, करणवीर मेहरा, रजत दलाल, अविनाश मिश्रा, चुम दरांग आणि ईशा सिंह हे स्पर्धक टॉप 6 पर्यंत पोहोचले होते. अंतिम लढत विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा या दोघांमध्ये होती. तर फिटनेस इन्फ्लुएन्सर रजत दलाल या शोमध्ये तिसऱ्या स्थानी राहिला.