वाढत्या वयाबरोबर चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषाही दिसू लागतात. त्वचेची काळजी न घेणे आणि खराब जीवनशैलीमुळे त्वचेशी संबंधित समस्या वाढू लागल्या आहेत. चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु उत्पादनांमध्ये वापरण्यात येणारी रसायने त्वचेला हानी पोहोचवू शकतात.
आयुर्वेद तज्ञ डॉक्टर डिंपल जांगड़ा सांगतात की त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल लावू शकता. ऑलिव्ह ऑईल चा वापर हा सुरकुत्यांसाठी एक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे. ऑलिव्ह ऑईल मध्ये अँटिऑक्सिडेंट, व्हिटॅमिन ई आणि इतर पोषक घटक असतात. जे त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. जाणून घेऊ ऑलिव्ह ऑईलचा वापर सुरकुत्यांसाठी कसा केला जातो.
ऑलिव्ह ऑईलने मसाज
सर्वप्रथम एक किंवा दोन चमचे ऑलिव्ह ऑईल घ्या ते थोडेसे गरम करा जेणेकरून ते त्वचेत चांगले शोषले जाईल. आता चेहऱ्याच्या ज्या भागांवर सुरकुत्या दिसतील त्या भागांवर बोटांनी लावा. दहा ते पंधरा मिनिटे मसाज केल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हे तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी देखील करू शकता.
ऑलिव्ह ऑईल आणि मध
एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि मध सुरकुत्यांसाठी खूप फायदेशीर आहे. याला चांगले मिक्स करून चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. वीस मिनिटे तसेच राहू द्या त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
ऑलिव्ह ऑईल आणि खोबरेल तेल
एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि खोबरे तेल घ्या आणि ते चांगले मिसळा. यानंतर चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा 15 ते 20 मिनिटांनी चेहरा धुवा. सुरकुत्या कमी करण्यासाठी हे फायदेशीर असते. या सोबतच यामुळे चेहऱ्याला ओलावाही मिळतो.
ऑलिव्ह ऑईल आणि कोरफडीचा गर
कोरफड त्वचेची जळजळ आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी ओळखली जाते. ऑलिव्ह ऑईल मध्ये कोरफड मिसळून वापरल्याने त्वचेचा पोत सुधारतो आणि सुरकुत्या कमी होतात. साधारण 15 मिनिटे हे लावून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.