Gangakhed Assembly Elections: लक्ष्मी अस्त्राच्या वापराला निवडणूक आयोग लगाम लावणार का?

2 hours ago 1

परभणीतील गंगाखेड विधानासभा मतदारसंघ

परभणी/गंगाखेड (Gangakhed Assembly Elections) : मतदारांना प्रलोभन दाखवीत दारू व पैशाचे अमिष दाखवून विधानासभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांना पैसे वाटप केल्या प्रकरणी गेल्या निवडणुकीत गंगाखेड विधानसभा मतदार संघातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत. (Gangakhed Assembly Elections) गंगाखेड विधानसभा मतदार संघात मतदानासाठी मोठ्या प्रमाणात लक्ष्मी अस्त्राचा वापर झाल्याने या मतदार संघाला संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्धी मिळाली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या लक्ष्मी अस्त्र वापराला लगाम लावण्यासाठी निवडणूक आयोग काही उपयोजना करणार का असा सवाल मतदारांतून उपस्थित केला जात आहे.

विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्व पक्षाच्या कार्यकर्ते, पुढऱ्यांबरोबर निवडणूक विभाग ही कामाला लागला आहे. (Gangakhed Assembly Elections) गंगाखेड विधानसभा मतदार संघातील गंगाखेड, पालम व पूर्णा तालुक्यातील २१७१९१ पुरुष मतदार, २०२०२८ महिला मतदार व ५ तृतीय पंथी मतदार असे एकूण ४१९२२४ मतदार ४३२ मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावुन आमदार निवडणार आहेत.

विधानासभा निवडणूकीची (Gangakhed Assembly Elections) संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी ४५ झोनमध्ये झोनल अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसह सुमारे २००० पेक्षा अधिक मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आदर्श आचार संहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी व निवडणूकीतील प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवण्यासाठी ११ भरारी (एफएसटी) पथक, प्रत्येकी तालुक्यात २ प्रमाणे तीन तालुक्यात ६ एसएसटी पथक, ५ व्हीएसटी पथक, विधानासभा मुख्यालयात १ चित्रीकरण (व्हीव्हीटी) पथक असे एकूण २३ पथके स्थापन करण्यात आली आहे.

विधानसभा मतदार संघात आदर्श आचार संहितेचा भंग होत असल्यास नागरिकांना त्याची ऑनलाईन तक्रार करता यावी यासाठी निवडणूक आयोगाने सीव्हीजिल अँप तसेच १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला असल्याची माहिती (Gangakhed Assembly Elections) गंगाखेड विधानसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गंगाखेड तहसीलदार उषाकिरण श्रँगारे, पालम तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, पूर्णा तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली असली तरी मागील विधानासभा निवडणूकांचा अनुभव पाहता या मतदार संघात मतदारांना पैसे वाटून लक्ष्मी अस्त्राचा वापर केल्याची पुनरावृती आगामी विधानासभा निवडणुकीत होऊ नये याची खबरदारी घेत मतदारांना प्रलोभन देत पैसे वाटप करणाऱ्या उमेदवारांना वेळीच आळा घालून लक्ष्मी अस्त्राच्या वापराला लगाम लावण्यासाठी निवडणूक आयोग काही उपाय योजना अखणार का असा सवाल मतदारांतुन उपस्थित केला जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article