केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज शुक्रवारी संसदेत २०२४-२५ चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. (file photo)
Published on
:
31 Jan 2025, 9:41 am
Updated on
:
31 Jan 2025, 9:41 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज शुक्रवारी संसदेत २०२४-२५ चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. आर्थिक सर्वेक्षण २०२४-२५ नुसार, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये भारताचा देशांतर्गत सकल राष्ट्रीय उत्पादनात अर्थात जीडीपी वाढीचा दर ६.३ ते ६.८ टक्के राहण्याचा अंदाज आहे. पुढील वर्षी आर्थिक स्थिती मंदावलेली राहील, असाही अंदाज व्यक्त केला आहे. आर्थिक सर्वेक्षणातून देशाच्या आर्थिक स्थितीचे आणि भविष्यातील दिशेचे संपूर्ण विश्लेषण सादर केले जाते.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेची गती काहीशी मंदावलेली दिसून आली. या पार्श्वभूमीवर आर्थिक सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारताला एक अथवा दोन दशकांपर्यंत सुमारे ८ टक्के विकास दर गाठावा लागेल.