IND vs AUS Perth Test : विराट कोहलीसोबत पर्थवर मोठा ‘अनर्थ’, अशी हालत होण्याची 10 वी वेळ

5 hours ago 1

ऑस्ट्रेलियात विराट कोहलीची बॅट तळपणार अशी अपेक्षा होती. 10 वर्षापूर्वी याच विराटने ऑस्ट्रेलिया गाजवली होती. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर विराटने नेहमीच त्याच्या फॉर्मबद्दल शंका उपस्थित झाल्यानंतर त्याने धावा केल्या आहेत. पुन्हा एकदा विराटचा खराब फॉर्म सुरु आहे. त्याच्या करियरवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. अशावेळी विराट ऑस्ट्रेलियात आहे. पण त्याला विश्वार्ह प्रदर्शन करता आलेलं नाही. पर्थमध्ये भारत-ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरीज सुरु झालीय. आज कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी पहिल्या सेशनमध्ये विराट कोहली फक्त 5 रन्स काढून आऊट झाला.

ऑप्टस स्टेडियममध्ये 22 नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून पहिली फलंदाजी स्वीकारली. या मैदानाचा इतिहास लक्षात घेता हा निर्णय चुकीचा नव्हता. या मैदानावर खेळल्या गेलेल्या मागच्या चार टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. त्यामुळे कॅप्टन जसप्रीत बुमराहचा निर्णय चुकीचा नाहीय. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन भारतीय फलंदाजांना अडचणीत आणलय. पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळणारा युवा ओपनर यशस्वी जैस्वाल आणि तिसऱ्या नंबरवर आलेले देवदत्त पडिक्कल खातही उघडू शकले नाहीत.

पण विराट कोहलीने निराश केलं

फक्त 12 धावात 2 विकेट गेल्यानंतर स्टार फलंदाज विराट कोहलीकडून सगळ्यांना अपेक्षा होती. पण विराट कोहलीने निराश केलं. पर्थच्या, बाऊन्स मिळणाऱ्या खेळपट्टीवर विराट कोहलीला जोश हेझलवूडने जाळ्यात अडकवलं. विराटने पहिल्या स्लीपमध्ये कॅच देऊन पॅव्हेलियनची वाट धरली. हेझलवूडने 10 व्यां दा कोहलीला आऊट केलं. हेझलवूड तिन्ही फॉर्मेटमध्ये कोहलीला सर्वाधिक वेळा आऊट करणारा गोलंदाज बनला आहे. कोहलीने 12 चेंडूत फक्त 5 धावा केल्या. खराब प्रदर्शनाचा सिलसिला ऑस्ट्रेलियातही कायम आहे.

चेतेश्वर पुजाराने सांगितली चूक

चेतेश्वर पुजाराने विराट कुठे चुकला ते सांगितलं. ऑस्ट्रेलियात खासकरुन पर्थच्या विकेटवर खेळताना चेंडूला मिळणारी उसळी लक्षात घ्यावील लागते. म्हणून क्रीजच्या आत राहिलं पाहिजे. जेणेकरुन बाऊन्स चुकवता येईल. पुजारा म्हणाला की, “कोहली फ्रंट फुटवर होता. क्रीजच्या आत राहिल्यास किंवा बॅकफूटवर खेळल्यास उसळी घेणाऱ्या चेंडूंचा सामना करणं थोडं सोप असतं. सुरुवातीच्या तासाभरात किंवा पहिल्या सेशनमध्ये कमी धावा झाल्या असत्या तरी चालल्या असत्या. त्यानंतर धावा काढता आल्या असत्या”

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article