टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा संपूर्ण खेळ हा पावसामुळे वाया गेला. जोरदार पावसामुळे बीसीसीआयने दुसऱ्या दिवसाचा खेळ हा रद्द करण्याचा निर्णय केला. मात्र त्यानंतर अखेर दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्याने सामना होण्याची चिन्हं आहेत.सामन्याला सुधारित वेळेनुसार सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 8 वाजून 45 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार रोहित शर्मा याने फलंदाजाचा निर्णय घेत न्यूझीलंडला फिल्डिंगसाठी भाग पाडलं आहे. या सामन्याचं आयोजन हे बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.