महाकुंभला जाणाऱ्या महिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच एक प्रकरण समोर आलय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या भागात तणाव निर्माण झाला आहे. आरोपी युवकाच नाव साबीर आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्याने महाकुंभला जाणाऱ्या महिलांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. साबीर उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील मीरगंज येथे राहतो. साबीरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदू समुदायात संतापाची भावना आहे. त्यांनी आरोपी विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात रिपोर्ट नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. साबीर फरार आहे. पोलिसाचं म्हणण आहे की, ते लवकरच आरोपीला अटक करतील. “सांप्रदायिक सौहार्दाची भावना कायम ठेवणं प्राथमिकता आहे. कुठलीही चिथावणी खोर कृती सहन केली जाणार नाही” असं पोलिसांकडून सांगण्य़ात आलं.
बरेलीच्या मीरगंज गावातील हे प्रकरण आहे. इथे राहणाऱ्या साबीरने महाकुंभमधल्या महिलांबद्दल अभद्र टिप्पणी करुन या भागातील वातावरण बिघडवलं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हिंदू समुदायाच्या लोकांनी या कृतीचा कडाडून विरोध केला आहे. पोलिसात तक्रार नोंदवलीय. लोकांमधील वाढता रोष लक्षात घेऊन मीरगंज पोलिसांनी आरोपी साबीर विरोधात रिपोर्ट नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात कायदेशीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे.
लोकांना शांतता ठेवण्याच आवाहन
आरोपीला लवकरात लवकर अटक करुन कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी स्थानिक लोकांची मागणी आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी या भागात गस्त वाढवली आहे. लोकांना शांतता ठेवण्याच आवाहन केलं आहे. हे वक्तव्य म्हणजे धार्मिक भावना भडकवण्याचा प्रकार आहे असं हिंदू समुदायाने म्हटलं आहे. प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याच पोलीस प्रशासनाने आश्वासन दिलय. दोषीला सजा सुनावली जाईल. पोलीस आरोपीला पकडण्यासाठी ठिकठिकाणी छापेमारी करत आहे. पण आरोपी अजून फरार आहे.