Budget 2025 | अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रियाfile photo
Published on
:
01 Feb 2025, 7:38 am
Updated on
:
01 Feb 2025, 7:38 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : Union Budget 2025 | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसीत भारताचा आहे. भारताला गतीने पुढे नेणारा आणि प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडे चाललेला हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प भारताच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली. (Budget 2025)
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला शुक्रवारी सुरुवात झाली. मोदी सरकारच्या ऐतिहासिक तिसर्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडला. संसदेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.