बजेटमध्ये महागाईवर काहीच नाही:कृषी विभागाचे केवळ कौतुक, पण हमीभाव नाही; पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले मोदी सरकारचे चिमटे

3 hours ago 1
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्राचा अर्थसंकल्प हा बिहार विधानसभेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून सादर करण्यात आल्याचा दावा केला आहे. केंद्राच्या अर्थसंकल्पात महागाईच्या मुद्यावर काहीच नाही. त्यात कृषी विभागाचे कौतुक करण्यात आले आहे, पण हमीभावाचा कोणताही उल्लेख नाही. एवढेच नाही तर लोकांचे सरासरी वार्षिक उत्पन्न वाढवण्याच्या बाबतीतही अर्थसंकल्पात कोणतीही तरतुद नाही, असे ते म्हणालेत. पृथ्वीराज चव्हाण केंद्रीय अर्थसंकल्पावर भाष्य करताना म्हणाले की, मोदी सरकारचे हे लोकसभा निवडणुकीनंतरचे पहिले अंदाजपत्रक होते. निवडणुकीनंतरच्या पहिल्या वर्षात काही कटू निर्णय घेणे अपेक्षित असते. त्यामुळे सरकारला आर्थिक सुधारणा राबवण्यास मदत होते. पण तसे झाले नाही. त्यामुळे सरकारने एकप्रकारे देशाचा आर्थिक विकासदर मंदावत असल्याचेच मान्य केले आहे. सरकार भारत 2047 पर्यंत विकसित देश होण्याचे स्वप्न दाखवत आहे. पण त्याची नेमकी व्याख्या सांगत नाही. आपण दरडोई उत्पन्नात 147 व्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे जनतेचे सरासरी वार्षिक उत्पन्न वाढवण्याची गरज होती. पण तसे काही होताना दिसत नाही. भारत विकसित देश होणे आम्हाला आवडेल. पण केवळ घोषणाबाजी करू चालत नाही. हे सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे. सरकारने यंदा महत्त्वपूर्ण धाडसी निर्णय घेणे गरजेचे होते. पण त्यांनी तसे केले नाही. केवळ बिहारची विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून काही घोषणा करण्यात आल्यात. अर्थसंकल्पात महागाईवर कोणत्याच उपाययोजना नाही. शेतकरी आत्महत्या रोखणार कशा? पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, सरकार अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांचे अश्रू पुसेल असा अंदाज होता. पण तो फोल ठरला. शिक्षण क्षेत्रासाठीही काहीही करण्यात आले नाही. अर्थमंत्र्यांनी कृषी खात्याचे कौतुक केले. पण शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. खर्चापेक्षा कमी उत्पन्न मिळाले तर सरकार शेतकरी आत्महत्या रोखणार कशा? विमा क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता परदेशीत कंपन्या भारतात येतील. पण सरकारने येथील विमा कंपन्यांना भक्कम करण्यास कोणतेही पाऊल उचलले नाही. AI च्या बाबतीत कुठेच नाही लाँग टर्म कॅपिटल गेनवर सूट मिळेल अशी अपेक्षा होती. पण तसे काहीच झाले नाही. महागाईमुळे घर चालवणे अघड होत असताना त्यावरही काहीच हालचाल नाही. रोजगार निर्मितीविषयी एखादी ठोस घोषा होईल असे वाटले होते, पण तसेही काही झाले नाही. शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होईल असा अंदाज होता. पण त्याचेही काही झाले नाही. विशेषतः चीनने एआयच्या स्पर्धेत अमेरिकेला मागे टाकले आहे. आपण यात कुठे आहोत हा प्रश्न आहे, असे ते म्हणाले. सरकारने 23 आयआयटी सुरू करण्याची घोषणा केली, पण आता अस्तित्वात असणाऱ्या आयआयटीच्या शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. तिथे शिकवण्यासही स्टाफ नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी बोलताना म्हणालेत. हे ही वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article