बिग बॉस 18 हा सीझन संपल्यानंतर आता प्रेक्षकांना आतुरता आहे बिग बॉस OTTची. ओटीटी सीझनचा हा चौथा भाग असेल. मात्र बिग बॉस 18 व्या सीझनवेळी सलमान खानने ही त्याची शेवटी होस्टींग असणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता बिग बॉस ओटीटी सीझनचा होस्ट कोण असणार याबद्दल चाहत्यांना प्रश्न पडला आहे. सलमान खानऐवजी होस्टींगसाठी काही कलाकारांची नावे समोर आली आहेत.
बिग बॉसचा ओटीटीचा चौथा सीझन लवकरच
बिग बॉसचा ओटीटीचा चौथा सीझन लवकरच योणार आहे. आता लोकांमध्ये या शोची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे, लोकांमध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे की यावेळी बिग बॉस ओटीटी होस्ट कोण करणार आहे. या शोचा होस्ट म्हणून लोकांना सलमान खान सर्वाधिक आवडत असला तरी आता यासाठी आणखी दोन कलाकारांची नावे पुढे येत आहेत.
सलमान नाही तर या स्टारची नावे होस्टींगसाठी पुढे
बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनबद्दल बोलायचे झाले तर तो चित्रपट निर्माता करण जोहरने होस्ट केला होता. त्यानंतर सलमान खानने दुसऱ्या सीझनमध्ये पुनरागमन केले. पण, त्यानंतर तिसऱ्या सीझनमध्ये सलमान खान पुन्हा होस्ट म्हणून दिसला नाही, त्याच्या जागी अनिल कपूरने शो होस्ट केला.
आता आगामी सीझनच्या होस्टबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे शोच्या होस्टसाठी सलमान खान व्यतिरिक्त रोहित शेट्टी आणि सोनू सूद यांची नावे पुढे येत आहेत.
सलमान खानचं नाव अद्याप तरी होस्टींगसाठी नाही
बिग बॉस ओटीटीच्या चौथ्या सीझनची निर्माते तयारी करत असल्याचं म्हटलं जात आहे. इंडिया फोरमच्या रिपोर्टनुसार, सलमान खान ओटीटीच्या या सीझनमध्ये होस्ट म्हणून दिसणार नाही. त्याच्या जागी निर्मात्यांनी रोहित शेट्टीशी संपर्क साधला आहे, याशिवाय सोनू सूदला देखील ही ऑफर देण्यात आली आहे, परंतु अद्याप दोघांकडूनही प्रतिसाद मिळालेला नाही.
बिग बॉस ओटीटीच्या सीझनबद्दल…
चौथ्या सीझनमध्ये शो कोण होस्ट करणार हा लोकांसमोर मोठा प्रश्न आहे. बिग बॉस ओटीटीच्या शेवटच्या सीझनबद्दल बोलायचं झाल्यास, या शोची पहिली विजेती दिव्या अग्रवाल होती, दुसऱ्या सीझनमध्ये एल्विश यादव आणि तिसऱ्या सीझनमध्ये सना मकबूलने हे विजेतेपद पटकावलं होतं. जर आपण बिग बॉस सीझन 18 बद्दल बोललो तर या सीझनचा विजेता करणवीर मेहरा होता. याशिवाय विवियन डिसेना या शोचा फर्स्ट रनर अप ठरला.