मराठी इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी बॉलिवूमध्येही आपली खास ओळख निर्माण केली आहे. ज्यांनी कोणत्याही गॉड फादर शिवाय केवळ आपल्या मेहनतीच्या दोरावर हिंदी इंडस्ट्रीमध्ये आपली खास जागा निर्माण केली आहे. त्यातील असा एक अभिनेता आहे जो मराठी मातीतला आहे मात्र त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर हिंदीमध्येही आपली छाप पाडली आहे.
गश्मीर महाजनीचं मराठी इंडस्ट्रीसाठी मोठं काँट्रीब्युशन
अनेक मराठीसह हिंदी चित्रपट, सिरिअल्स, वेब सिरीजमध्ये अभिनेत्याने काम केलं आहे. एवढच नाही तर या अभिनेत्याने आपल्या मराठी इंडस्ट्रीसाठी मोठं काँट्रीब्युशनही दिलं आहे.
हा अभिनेता आहे हॅंडसम हंक गश्मीर महाजनी. मुस्कुरके देख जरा मधला विवेक ते एक राधा एक मीरा मधला कृष्णा, प्रेमा तुझा रंग कसा मधला यजमान ते खतरो के खिलाडी, श्रीकांत बशीर, गुनाह यांसारख्या वेब सिरीज आणि चित्रपटातून तो प्रेक्षकांचा समोर आला आणि त्याने त्याचा चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
चित्रपटांच्या फीबद्दल गश्मीरचा महत्त्वाचा निर्णय
गश्मीर अभिनयासोबतच डान्ससाठीही तेवढाच चर्चेत असतो. एवढच नाही तर गश्मीरने मराठी इंडस्ट्रीसाठी मोठं काँट्रीब्युशन दिलं आहे. पण ते एका वेगळ्या स्वरुपात. जिथे चित्रपटांसाठी स्क्रिप्टसोबतच मानधन किंवा फी आधी सांगितले जाते तिथे मात्र गश्मीरने एक वेगळाच निर्णय घेतला.
चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, गश्मीरने या काँट्रीब्युशनबद्दल सांगितलं. तो म्हमाला “मी मराठी चित्रपट करताना निर्मात्यांनी विचारल्यावर माझी फी सांगतो पण, मी त्यांना सांगतो की हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर पैसे उरले तर मला द्या… नाही तर आपला चित्रपट रिलीज झाल्यांनतर प्रॉफिट झाला तर मला पैसे द्या. मी पैसे कमवण्याचे इतर मार्ग शोधतो, मी हिंदी टिव्ही शो, वेब सिरीज करून त्यातून पैसे कमावतो. मराठी सिनेमाकता हे माझं काँट्रीब्युशन आहे. मराठी सिनेमाला सध्या पुशची गरज आहे आणि हे माझ्या कडून थोडं काँट्रीब्युशन आहे असं मी मानतो.” असं म्हणत त्याने मराठी इंडस्ट्रीसाठी हे खूप मोठं पाऊल उचललं आहे. गश्मीरच्या या निर्णयाचं सर्वांनीच कौतुक केलं आहे.
‘एक राधा एक मीरा’
दरम्यान गश्मीरचा ‘एक राधा एक मीरा’ हा चित्रपट लवकरचं मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. 7फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटातील कृष्णाची भूमिकेत गश्मीर महाजनी दिसणार आहे. चित्रपटात एक कॅन्डी फ्लॉस रोमान्स पाहायला मिळणार असल्याचंही त्याने सांगितलं.