विषारी बिस्किटे खाऊ घालून नऊ कुत्र्यांना ठार मारल्याची घटना घडली.
Published on
:
01 Feb 2025, 4:54 pm
Updated on
:
01 Feb 2025, 4:54 pm
छत्रपती संभाजीनगर : मैदानावर विषारी बिस्किटे टाकून अज्ञाताने महिला उपनिरीक्षकाच्या पाळीव कुत्र्यासह चार मोकाट कुत्रे आणि चार पिल्ले असे नऊ कुत्रे ठार मारले. ही संतापजनक घटना गुरुवारी (दि. ३०) सकाळी पावणे सातच्या सुमारास पहाडसिंगपुरा भागात घडली.
फिर्यादी उषा राजू घाटे (५२, रा. शुभ नगर, पहाडसिंगपुरा) या पोलिस कल्याण विभागात उपनिरीक्षक म्हणून नोकरीला आहेत. त्या त्यांनी सकाळी पावणे सातच्या सुमारास त्यांचा लेब्रा डॉग जातीचा पाळीव कुत्रा मैदानावर सोडला. पंधरा मिनिटाने त्याला घरात आणून सोडले. त्यानंतर उषा घाटे या पतीसह मॉर्निंग वॉकसाठी गेल्या. साडेआठच्या सुमारास परत आल्यानंतर त्यांचा कुत्रा उलट्या करत असल्याचे दिसले. तेव्हा शेजारच्या छगन सलामपुरे यांनी त्यांना सांगितले की, मैदानावर कोणीतरी विषारी बिस्किटे टाकली होती. ते त्याने खाल्ले असेल. त्याला पशु वैद्यकीय रुग्णालयात नेले मात्र तो मयत झाला. त्याच्यासोबत मोकाट चार कुत्रे आणि चार पिल्ले देखील ते बिस्कीट खाऊन ठार झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसात अज्ञातांविरुद्ध बीएमएस ३२५ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.