सावखेड (खं) येथे चोरट्यांनी भरदिवसा तीन घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला.
Published on
:
01 Feb 2025, 6:10 pm
Updated on
:
01 Feb 2025, 6:10 pm
शिऊर : वैजापूर तालुक्यातील सावखेड (खं) येथे चोरट्यांनी भरदिवसा तीन घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी (दि.०१) दुपारी दोनच्या सुमारास घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने शिऊरसह परिसरात भीतीचे वातावरण आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सावखेडा शेतवस्तीवरील गट. क्र. १११ व १९ मध्ये शेतवस्तीवर तीन ठिकाणी दुपारी २ च्या सुमारास चोरट्यांनी तीन घरांचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कमेसह दागिन्यांची चोरी केली. या घटनेत संदीप जाधव (रा. सावखेडा) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन तोळे सोने व पन्नास हजाराची रक्कम, रमेश जाधव यांच्या घरातून एक तोळे सोने व पन्नास हजाराची रोख रक्कम, तर ज्ञानेश्वर मगर यांच्या घरातून एक तोळे सोने चाळीस हजाराची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब विजय भिल्ल व शिऊर पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी डॉग स्कॉड पाचारण करण्यात आले होते.