टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) कॉलिंग आणि एसएमएस-ओन्ली रिचार्ज प्लॅन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर एअरटेल, जिओ आणि व्हीआयने ग्राहकांसाठी नवीन व्हाउचर लाँच केले आहेत. हे प्लॅन डेटा बेनिफिट्स असलेल्या प्लॅन्सच्या तुलनेत खूपच स्वस्त आहेत. तसेच काही दिवसांपूर्वीच एअरटेल आणि जिओ या दोन्ही कंपन्यांनी त्यांचे काही व्हॅल्यू प्लॅन्सही अपडेट केले असून सध्या या प्लॅन्सचे रिव्ह्यू करत आहेत. त्याचबरोबर एअरटेल, व्हीआय आणि जिओकडून डेटा बेनिफिटशिवाय येणाऱ्या नवीन रिचार्ज प्लॅन्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये एअरटेल आणि जिओ या दोन्ही कंपन्यांनी त्यांचे काही व्हॅल्यू प्लॅनही बंद केले आहेत, जे डेटा बेनिफिटसह येत होते. चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्या नवीन प्लॅन बद्दल…
एअरटेलचा व्हॉईस, एसएमएस ओन्ली प्लॅन
एअरटेलच्या 1,849 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 365 दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 3,600 एसएमएस ऑफर केले जातात. या प्लॅनचा दररोजचा खर्च सुमारे 5.06 रुपये इतका असेल.
त्याचबरोबर एअरटेलच्या 469 रुपयांच्या प्लॅनवर नजर टाकली तर हा प्लॅन तुम्हाला 84 दिवसांची वैधता देतो. यासोबत तुम्हाला 900 एसएमएसही मिळतात. या प्लॅनचा दररोजचा खर्च सुमारे 5.58रुपये इतका असेल.
जिओचा व्हॉईस आणि एसएमएस ओन्ली प्लॅन
जिओच्या 1,748 रुपयांच्या प्लॅनमध्ये सर्वाधिक 336 दिवसांची वैधता आणि 3,600 एसएमएस बेनिफिट्स मिळणार आहे. याशिवाय जिओ सिनेमाचे सब्सक्रिप्शनही मिळू शकते.
448 रुपयांच्या प्लॅनवर नजर टाकली तर हा प्लॅन तुम्हाला 84 दिवसांची वैधता देत आहे. तसेच 1000 एसएमएसचा सपोर्ट मिळतो. याचा अर्थ तुम्ही ऑफलाइन मेसेजद्वारे मोठ्या प्रमाणात चॅट करू शकता. या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema आणि JioCloud चे सब्सक्रिप्शन देखील मिळते.
व्हीआयचा 1,460 रुपयांचा प्लॅन
या व्हीआय प्लॅनमध्ये तुम्हाला 270 दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये रोज 100 फ्री एसएमएस मिळतात. एक्स्ट्रा मेसेज पाठवल्यास प्रत्येक लोकल एसएमएससाठी 1 रुपये आणि एसटीडी एसएमएससाठी 1.5 रुपये द्यावे लागतील. या प्लॅनसह दररोजचा मोबाइल खर्च 5.41 रुपये प्रतिदिन होईल.
या प्लॅन्सचा असा होईल फायदा
या प्लॅन्समुळे तुम्हाला एक फायदा होईल तो म्हणजे जर घरात वाय-फाय असेल तर तुम्हाला तुमच्या फोनवरील डेटाचा खर्च करावा लागणार नाही. याव्यतिरिक्त, जे लोक इंटरनेट अजिबात वापरत नाहीत ते आता डेटाशिवाय येणारे प्लॅन निवडू शकतात.