पिझ्झाचे नाव ऐकताच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. हे फास्टफूड आज सर्वांच्याच आवडीचे झाले आहे. पण पिझ्झामध्ये वापरल्या जाणाऱ्या मैद्याच्या बेसमुळे बऱ्याचदा लोक ते खाण्यास नकार देतात कारण मैदा आरोग्यासाठी हानिकारक मानला जातो. विशेषतः जर तुम्ही आरोग्याबाबत जागरूक असाल किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर मैद्याच्या बेस पासून बनवलेला पिझ्झा तुम्ही नक्कीच टाळत असणार. पण पिझ्झा हेल्दी आणि टेस्टी बनवण्याचा एक मार्ग आहे तो तुम्हाला माहिती आहे का? मैदा न वापरता तुम्ही घरच्या घरी चविष्ट पिझ्झा बनवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही आरोग्यदायी गोष्टी वापराव्या लागतील. ही रेसिपी फक्त सोपी नसून तर काही मिनिटातच तयार होणारी आहे. जाणून घेऊ पिझ्झा बेस मैदा न वापरता कसा तयार करता येईल.
पिझ्झा बेस तयार करण्यासाठी पर्याय
मैदा न वापरता पिझ्झा बेस बनवण्यासाठी तुम्ही गव्हाचे पीठ, ओट्स चे पीठ, बाजरीचे किंवा ज्वारीचे पीठ, ब्रेडचे तुकडे, बटाट्याचा बेस वापरू शकता आणि पिझ्झा हेल्दी बनवू शकता.
मैदा न वापरता पिझ्झा बेस बनवण्यासाठी लागणारे साहित्य
गव्हाचे पीठ (किंवा अन्य पर्याय) १ कप पिझ्झा सॉस २ चमचे मोझरेला चीज १/२ कप शिमला मिरची बारीक चिरलेला कांदा टोमॅटोचे पातळ काप ऑलिव्ह ऑईल 1 टेस्पून चवीनुसार ओरेगॅनो चिली फ्लेक्स
कृती
पिझ्झा बेस तयार करा
गव्हाच्या पिठात पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. कणकेचा छोटा गोळा घ्या आणि पिझ्झा प्रमाणे त्याला गोल आकार द्या. मंद आचेवर तव्यावर किंवा नॉनस्टिक पॅनवर तुम्ही बाजूने हलका भाजून घ्या.
पिझ्झा टॉपिंग करा
तयार बेसवर पिझ्झा सॉस लावा. मोझरेला चीज किसून घ्या आणि टॉपिंग वर टाका आणि चिली फ्लेक्सने सजवा.
पिझ्झा बेक करा
पिझ्झा पॅन वर ठेवा आणि झाकणाने झाकून ठेवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ओव्हन किंवा मायक्रोवेव्हमध्ये देखील बेक करू शकता. चीज वितळेपर्यंत मंद आचेवर पिझ्झा राहू द्या. पॅन मधून काढून त्याचे तुकडे करा आणि गरम सर्व्ह करा.