अर्थसंकल्पात सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाचा एक रुपयाचा हिशोब दिला आहे.PTI Infographics
Published on
:
01 Feb 2025, 11:50 am
Updated on
:
01 Feb 2025, 11:50 am
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : रालोआ सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी लोकसभेत मांडला. अर्थसंकल्पात गरीब, मध्यमवर्ग, शेतकरी, युवा, महिला या वर्गावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. तर अर्थमंत्र्यांनी त्यांच्या सलग आठव्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाचा एक रुपयाचा हिशोब दिला आहे. (Union Budget 2025)
अर्थमंत्र्यांनी त्यांच्या सलग आठव्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाचा एक रुपयाचा हिशोब दिला आहे. ज्यामध्ये प्रत्येक एक रुपयाच्या उत्पन्नापैकी जास्तीत जास्त २४ पैसे कर्ज आणि इतर दायित्वांमधून येणार आहेत. यानंतर, २२ पैसे आयकरातून, १८ पैसे जीएसटी आणि इतर करांमधून, १७ पैसे कॉर्पोरेट करातून, ९ पैसे कर सोडून इतर प्राप्तीतून, ५ पैसे केंद्रीय उत्पादन शुल्कातून, ४ पैसे सीमा शुल्कातून आणि १ पैसा कर्ज नसलेल्या भांडवली पावत्यांमधून येणार आहे. (Union Budget 2025)
१ रुपयांच्या उत्पन्नापैकी सरकार राज्यांना कर आणि शुल्कात त्यांचा वाटा म्हणून २२ पैसे देणार. याशिवाय, २० पैसे व्याज भरण्यासाठी, १६ पैसे केंद्रीय क्षेत्र योजनेसाठी (भांडवली खर्च आणि संरक्षणावरील अनुदान वगळून), ८ पैसे संरक्षणासाठी, ८ पैसे वित्त आयोग आणि इतर हस्तांतरणांसाठी, ८ पैसे केंद्रीय योजनेसाठी, ४ पैसे पेन्शनसाठी, ६ पैसे अनुदानासाठी आणि इतर बाबींसाठी ८ पैसे.
- कॅन्सरची ३६ औषधे
- वैद्यकीय उपकरणे
- भारतात बनवलेल्या कपडे
- मोबाईल फोन, बॅटरी
- लेदर जॅकेट, शूज, बेल्ट, पाकीट
- ईव्ही वाहने
- एलसीडी, एलईडी टीव्ही
- हँडलूम कपडे
- अत्यावश्यक खनिजे
- जहाजबांधणी
- विणलेले कापड
- फ्लॅट पॅनेल डिस्प्ले