परभणी/जिंतूर (Parbhani) :- टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी परभणीला हलविण्यात आले. मात्र जखमीचा मृत्यू (Death) झाला. ही घटना शनिवार १ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता जिंतूर शहरातील नृसिंह चौकात घडली.
जिंतूर शहरातील नृसिंह चौकातील घटना
या अपघाता विषयी अधिक माहिती अशी की, जिंतूर शहरातील नृसिंह चौकात एम.एच.२२ ए.एन.५०९६ या क्रमांकांच्या वाहन चालकाने त्याचे वाहन निष्काळजीपणे चालवत एम.एच.२२ ए.एफ.९१७२ या क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात (Accident) सोनापूर येथील विनायक शिवलाल चव्हाण जखमी झाले. यावेळी जमा झालेल्या नागरीकांनी बघ्याची भूमिका घेतली. गर्दी हटवत अॅटो चालक हुजूर यांनी पुढाकार घेत काही युवकांच्या मदतीने जखमीला रूग्णालयात दाखल केले. नागरीकांनी टिप्परच्या चालकाला पोलीसांच्या ताब्यात दिले. जखमीला उपचारासाठी परभणीला पाठविण्यात आले. मात्र संबंधिताचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. सदर प्रकरणी जिंतूर पोलीसात नोंद झाली नव्हती.