Nashik | जिल्हा समाजकल्याण अधिकारीपदी हर्षदा बडगुजर

2 hours ago 1

जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांची भेट घेतल्यानंतर हर्षदा बडगुजर यांनी पदभार स्वीकारला.pudhari news network

पुढारी वृत्तसेवा

Published on

18 Oct 2024, 3:57 am

नाशिक : जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण अधिकारीपदी हर्षदा बडगुजर यांची नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी (दि.10) बडगुजर यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला.

बडगुजर यांनी 2014 मध्ये जिल्हा समाजकल्याण अधिकारी (District Social Welfare Officer) म्हणून धुळे येथे पदभार घेतला. याठिकाणी सलग 7 वर्षे सेवा दिली. यात काही महिने सहायक आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभारदेखील त्यांच्याकडे होता. 3 वर्षांपूर्वी नासर्डी पूल येथील राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागात समाजकल्याण अधिकारी म्हणून त्यांनी काम बघितले. त्यानंतर त्यांची नाशिक जिल्हा परिषदेत जिल्हा समाजकल्याण अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून, नुकताच पदभार स्वीकारला. समाजकल्याणसह दिव्यांगांच्या विविध योजना तळागाळात पोहोचविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. अनेक शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविणार असल्याचा विश्वास बडगुजर यांनी व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article