“…नाहीतर पेग्विनची काळजी करीत राणीच्या बागेत बसा”, भाजप नेत्याची जहरी टीका

2 hours ago 1

Dharavi Redevelopment Dispute : राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होताच आता अनेक नेते एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहे. सध्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजप नेते आशिष शेलार हे आमनेसामने आले आहेत. आदित्य ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन भाजपवर जोरदार टीका केली होती. आता या टीकेला आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही खुल्या चर्चेला तयार आहोत. तुम्ही या”, असे आवाहन आशिष शेलार यांनी अमित ठाकरेंना दिले आहे.

आदित्य ठाकरेंनी धारावी पुनर्विकास योजनेवरुन भाजपवर जोरदार आरोप केले आहे. धारावीत 300 एकर पुनर्विकासाच टेंडर अदानीला दिलंय. मुंबईतील तुमची आमची जमीन अदानीला फुकटात दिलीय. कुर्ला, मढ, देवनार येथील जमिन अदानींना दिलीय. मुंबईतील एकूण 1080 एकर जमीन फुकटात अदानींच्या घशात घातलीय, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. आता आशिष शेलार यांनी या आरोपावर प्रत्युत्तर दिले आहे.

आशिष शेलार यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी 1080 एकर आकडा आला कुठून? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यासोबतच आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना आम्ही खुल्या चर्चेला तयार आहोत.. तुम्ही या, असे आवाहनही दिले आहे.

आशिष शेलार काय म्हणाले?

बुद्धिमान खोटारडे आदित्य ठाकरे आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या.. खोटं बोलून पळ काढू नका !

◆1080 एकर आकडा आला कुठून?

◆अदानीच्‍या नावावर 1080 एकर जागा चढली, सरकारने दिली याबाबत शासकीय कागद, कॅबिनेट निर्णय दाखवा.

◆उलट धारावीतील नेचर पार्क 37 एकरचा भूखंड हडप करण्याचा डाव आहे की नाही ?

◆उत्तर द्या ! आम्ही खुल्या चर्चेला तयार आहोत.. तुम्ही या !!

◆नाहीतर पेग्विनची काळजी करीत राणीच्या बागेत बसा !, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

बुद्धिमान खोटारडे आदित्य ठाकरे आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या.. खोटं बोलून पळ काढू नका !

◆1080 एकर आकडा आला कुठून ?

◆अदानीच्‍या नावावर 1080 एकर जागा चढली, सरकारने दिली याबाबत शासकीय कागद, कॅबिनेट निर्णय दाखवा…

◆उलट धारावीतील नेचर पार्क 37 एकरचा भूखंड हडप करण्याचा…

— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 18, 2024

दरम्यान महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर त्यानंतर लगेचच तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article