माजी नगरसेविका योगिता आहेर यांच्यासह त्यांच्या मुलाला टवाळखोरांकडून मारहाण File Photo
Published on
:
27 Nov 2024, 10:02 am
Updated on
:
27 Nov 2024, 10:02 am
नाशिक | माजी नगरसेविका योगिता आहेर यांच्यासह त्यांच्या मुलाला टवाळखोरांकडून शिवीगाळ करत जबर मारहाण झाल्याचे समजते आहे. टवाळखोर संत कबीर नगर येथील असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांकडून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गाडी काढण्यावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.