Navegaon hospital: ग्रामीण रुग्णालयात नसबंदीच्या रुग्णांकडुन शस्त्रक्रियेच्या नावाखाली लुट

2 hours ago 1

4 रूग्णांकडून घेतले प्रत्येकी 4000 रुपये, कारवाईची मागणी

अर्जुनी/मोरगाव (Navegaon hospital) : गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नवेगाव/बांध येथील ग्रामीण रुग्णालयात 02 दिवसापुर्वी नसबंदी शस्त्रक्रियाचे 04 रुग्ण छत्तीसगढ़ राज्यातुन रुग्णालयात शस्त्रक्रिये करिता भरती झाले.ग्रामीण रुग्णालयाकडुन अनेक शस्त्रक्रिया मोफत केले जातात. परंतु नवेगाव/बांध येथील (Navegaon hospital) ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. आंनद गजभिये यांनी याआधी हायड्रोसिल हरणीयाच्या शस्त्रक्रियेसाठी निजाम शेख, सलीम खा पठाण आणि शालीकराम राऊत या 03 रुग्णांकडुन प्रत्येकी 6500 रुपये घेतल्याचे खुद रुग्णांनीच सांगितले होते.

तर हि बाब ताजी असतांनाच नसबंदीच्या 04 रुग्णांकडुन प्रत्येकी 04 हजार रुपये प्रमाणे पुन्हा पैशे घेतल्याचे खुद नसबंदीची शस्त्रक्रिया झालेल्या महिला रुग्णांनी पत्रकारांना सांगितले आहे.शासन अधिकाऱ्यांना गब्बर पगारा सोबतच राहण्यासाठी निवासस्थानाची सुविधा उपलब्ध करुन देऊन सुद्धा यांनी गरिबांना लुटावे का? याविषयी पत्रकाराने अधिक्षक डॉ.आनंद गजभिये यांना भ्रमणध्वनी वर संपर्क साधला असता त्यांनी पत्रकाराला घरी बोलावून घेतले. याविषयी माहिती न देता पत्रकाराला वाटेल त्या शब्दात अश्लील भाषेत शिवीगाळ केली. संपूर्ण शिवीगाळ व त्यांचे अघोरी कृत्य पत्रकाराने आपल्या मोबाईल फोन मध्ये चित्रित केले होते.

तर नसबंदी शस्त्रक्रिया झालेल्या प्रकरणा विषयी पत्रकार ग्रामीण रुग्णालय (Navegaon hospital) येथे जाब विचारण्यासाठी गेले असता डॉ. आनंद गजभिये यांनी माहिती न देता तिथुन पळ काढला तसेच डॉ. आनंद गजभिये या रुग्णालयात फार कमी उपस्थित राहतात त्यामुळे या वैद्यकीय अधिक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात यावे तसेच हरणीया, नसबंदीचे शस्त्रक्रिया करणाऱ्या एकुण 07 रुग्णांना याचा आर्थिक फटका बसला असुन वरिष्ठ अधिकारी आणि शासनाने सबंधितांवरती कठोर कार्रवाई करण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे. वरिष्ठांकडून भ्रष्ट अधिकाऱ्याची चौकशी होत आहे काय कारवाई केली जाते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article