News9 ग्लोबल महासमिटने सध्या जर्मनीत सर्वांचेच लक्ष वेधले आहे. स्टुटगार्ट स्टेडियमवर या महासमिटचे झोकात उद्घाटन झाले. जर्मनीतील या कार्यक्रमाची सुरूवात Tv9 नेटवर्क चे MD आणि CEO बरुण दास यांनी केली. जर्मनीचे मंत्री फ्लोरियन हॅसलर यांनी दोन्ही देशांची मैत्री पक्की असल्याचा दावा केला आहे. त्यांनी यावेळी अनेक वर्षांचा इतिहास चाळत दोन्ही देशांतील मैत्रीवर प्रकाश टाकला.
महासमिटचे केले कौतुक
यावेळी बाडेन-वुर्टेमबर्गचे मंत्री आणि चान्सलर फ्लोरियन हॅसलर यांनी महासमिटचे कौतुक केले. दोन्ही देशातील मैत्री सदृढ होण्यासाठी हे संमेलन महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगीतले. भविष्यात जागतिक मुद्यांवर एकमत होण्यासाठी आणि अनेक मुद्यांवर चर्चेसाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे गौरोद्वगार त्यांनी काढले.
हे सुद्धा वाचा
विकासावर केली चर्चा
या मंचावरुन त्यांनी जर्मनी आणि भारतीय विद्यापीठांमध्ये सहभागीदारी वाढवण्यावर जोर दिला. जर्मन कंपन्यांच्या भारतातील सक्रियतेबद्दल चर्चा केली. समिटमध्ये भारत आणि जर्मनीतील सतत आणि स्थिर विकासासाठी रोडमॅप तयार करण्यावर त्यांनी भर दिला. त्यांनी स्टुटगार्ट हे या संमेलनासाठी योग्य ठिकाण असल्याची पुस्ती जोडली.
या संमेलनात बाडेन-वुर्टेमबर्गचे मंत्री आणि चान्सलर प्रमुख फ्लोरियन हॅसलर यांनी या संमेलनावर कौतुकाचा वर्षाव केला. दोन्ही देशांना या संमेलनामुळे नवीन दृष्टी आणि संधी मिळेल असे ते म्हणाले. हॅसलरने अंतरराष्ट्रीय सहकार्याच्या महत्त्वावर भर दिला. भविष्यात जागतिक मुद्यांवर सहमतीसाठी असे संमेलन महत्त्वाची भूमिका बजावतात हे त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक मुद्यांवर सहमतीसाठी परिषद
या मंचावरुन त्यांनी जर्मनी आणि भारतीय विद्यापीठांमध्ये भागीदारी वाढवण्याविषयी त्यांनी विश्वास दाखवला. जर्मन कंपन्यांच्या भारतातील सक्रियतेबद्दल चर्चा केली. समिटमध्ये भारत आणि जर्मनीतील सतत आणि स्थिर विकासासाठी रोडमॅप तयार करण्यावर त्यांनी भर दिला. त्यांनी स्टुटगार्ट हे या संमेलनासाठी योग्य ठिकाण असल्याची पुस्ती जोडली. भविष्यात जागतिक मुद्यांवर भागीदारीसाठी स्टुटअर्ट येथील ही शिखर परिषद महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. आज दुपारी या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या विचारांचे पुष्प गुंफतील.