परभणी (Parbhani) :- जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कोम्बींग ऑपरेशन करत ऑल आऊट अभियान राबविण्यात आले. बुधवार २९ जानेवारीच्या मध्यरात्री पासून पहाटे पाच वाजेपर्यंत चाललेल्या या अभियानात पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्यांसह स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला.
पोलीस दलाच्या वतीने कोम्बींग ऑपरेशन करत ऑल आऊट अभियान राबविण्यात आले
नाकाबंदी दरम्यान १९ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. यासाठी ३६ अधिकारी, ९७ अंमलदार नेमण्यात आले. कोम्बींग ऑपरेशनमध्ये (Combing operation) ३५ हॉटेल, ३८५ वाहने तपासण्यात आली. तसेच ऑपरेशन दरम्यान ३३ गुन्हेगारांना (Criminals) तपासण्यात आले. यावेळी पाहिजे असलेल्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच २४ अजामिनपात्र वारंट बजावण्यात आले. पोलिसांनी ३ तडिपार इसमांची तपासणी केली. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, विविध ठाण्यांचे पोलीस अंमलदार यांनी कोम्बींग ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला.