Realme GT 7 Pro ची धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

2 hours ago 2

स्मार्टफोन चाहत्यांसाठी प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने अखेर Realme GT 7 Pro हा त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या लाँचची चर्चा भारतीय बाजारामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. त्यानंतर आता हा फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात देखील लाँच झाला आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, Realme GT 7 Pro 5G फोन नवीनतम Qualcomm च्या Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह येणारा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे. त्यामुळे आता तुम्हाला या फोनची स्पीड आणि कामाचा विचार करावा लागणार नाही. या स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंचाचा कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला असून, जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट देतो.

उत्कृष्ट कॅमेरा

उत्कृष्ट डिस्प्लेमुळे या फोनमधला तुमचा व्ह्यू एक्सपीरियंस खूप चांगला असणार आहे. यासोबतच फोनमध्ये 6500 एमएएच ची बॅटरी दिली असून हा स्मार्टफोन १२० वॉट अल्ट्रा फास्ट चार्जिंगसह तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच स्मार्टफोन चार्ज करण्यापूर्वी तुम्हाला विचार करण्याचीही गरज नाही. कॅमेरा सिस्टीमवरही कंपनीने बरेच अपग्रेड काम केले आहे. फोनमध्ये ५० एमपी पेरिस्कोप पोर्ट्रेट लेन्स असून ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP प्रायमरी सेन्सर, 50MP टेलिफोटो लेन्स आणि 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी, हँडसेटच्या समोर 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. म्हणजे तुम्हाला फोटोग्राफीही खूप चांगली मिळणार आहे. तसेच वॉटरप्रूफसाठी या फोनला IP69 रेटिंग मिळाले आहे. अर्थात पाण्यात भिजल्यावर देखील फोन खराब होणार नाही. विशेष म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतो की, याद्वारे पाण्याखालीही उत्तम फोटोज क्लिक करता येतील.

तर हा स्मार्टफोन 5जी कनेक्टिव्हिटीसह येत असेल तर तुम्हाला पूर्ण इंटरनेट स्पीडदेखील मिळत आहे. स्लीक डिझाइनमुळे तुम्हाला फोनची फारशी चिंता करण्याची गरज नाही. हा फोन ऑरेंज आणि गॅलेक्सी ग्रे रंगात उपलब्ध आहे.

किंमत

Realme GT 7 Pro च्या 12 जीबी व्हेरिएंटला खरेदी करण्यासाठी तुम्हाला 59,999 रुपये मोजावे लागतील. मात्र, सध्या लाँचिंग ऑफर सुरू असेल तर तुम्ही हा फोन 56,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज च्या फोनची किंमत ६२,९९९ रुपये आहे. तुम्हाला देखील हा फोन खरेदी करण्याची उत्सुकता लागली असेल तर या फोनची विक्री २९ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. फोनमध्ये डिझाईनही खूप चांगल्या प्रकारे दिले गेले आहे. मात्र यावेळी कंपनीने फोनच्या वजनावरही बरेच काम केले आहे. त्यामुळे तुम्हाला हा फोन सहज हाताळता येणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article