'माविआ'ला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. (Image source- ANI)
Published on
:
22 Nov 2024, 6:13 am
Updated on
:
22 Nov 2024, 6:13 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची उद्या शनिवारी (दि. २३) मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "उद्या निकाल येईल. आम्हाला खात्री आहे की आम्हाला बहुमत मिळेल. आमचे १६०-१६५ आमदार निवडून येतील. पण काहीजण त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. म्हणून आम्ही त्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याची व्यवस्था केली आहे.'' असे राऊत यांनी म्हटले आहे.
''मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडण्यात शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका असेल. महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. आम्ही सर्वानुमते निर्णय घेऊ. अजून कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. आम्ही सगळे एकत्र बसून मुख्यमंत्री निवडू..." असे राऊत यांनी पुढे म्हटले आहे.