Sharad Pawar NCP: ब्रेकिंग न्यूज: माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

3 hours ago 1

उमरेड (Sharad Pawar NCP) : माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये (Kishore Gajbhiye) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटमध्ये प्रवेश घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. गजभिये हे काँग्रेसकडून 2019 ची लोकसभा निवडणूक लढले होते. यात त्यांचा पराभव झाला व त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) काँग्रेसने तिकीट नाकारल्याने वंचित बहुजन आघाडी कडून ते निवडणूक लढले, यावेळी त्यांचा पराभव झाला होता.

उल्लेखनीय बाब म्हणजे, (Umred Assembly) उमरेड विधानसभा अनुसूचित जाती करता राखीव असून राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाने उमरेड विधानसभा वर दावा केला आहे. मात्र राष्ट्रवादीकडे (Umred Assembly) उमरेड विधानसभेत तगडा उमेदवार नव्हता. त्यामुळेच राज्याचे माझी गृहमंत्री अनिल देशमुख, यांनी किशोर गजभिये (Kishore Gajbhiye) यांना राष्ट्रवादीत आणून उमरेड विधानसभा राष्ट्रवादी लढण्याचे संकेत दिसून येत आहेत. (Kishore Gajbhiye) गजभिये यांचा पक्षप्रवेश नुकताच मुंबई येथील वाय बी चव्हाण सेंटर मध्ये पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, रमेशचंद्र बोंग, नागपूर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष राजूभाऊ राऊत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article