T20 World Cup 2024, NZ vs WI : उपांत्य फेरीत न्यूझीलंड-वेस्ट इंडिज आमनेसामने, असा लागला नाणेफेकीचा कौल

2 hours ago 1

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील महत्त्वाचा सामना न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात होत आहे. एका बाजूने दक्षिण अफ्रिकेने अंतिम फेरी गाठली आहे. आता दुसरा संघ न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज सामन्यातील निकालानंतर कळेल. या दोन्ही संघांनी साखळी फेरीत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे तूल्यबळ लढत होणार आहे.

 उपांत्य फेरीत न्यूझीलंड-वेस्ट इंडिज आमनेसामने, असा लागला नाणेफेकीचा कौल

| Updated on: Oct 18, 2024 | 7:05 PM

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी नवा विजेता मिळणार की नाही याचा फैसला आज उपांत्य फेरीत होणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज हे संघ आमनेसामने आले आहेत. वेस्ट इंडिजने एकदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे त्यांना उपांत्य फेरीत न्यूझीलंडला पराभूत करत अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका या संघांनी एकदाही जेतेपदाला गवसणी घातलेली नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला पराभूत केलं तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नवा विजेता मिळणार आहे. न्यूझीलंडने गट अ मध्ये चार पैकी 3 सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे. पहिल्या सामन्यात भारताला 58 धावांनी, दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव, तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत आणि शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला आणि अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे वेस्ट इंडिजनेही चार पैकी 3 सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेकडून पराभव झाला. त्यानंतर स्कॉटलंड, बांग्लादेश आणि इंग्लंडला मात दिली.

वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना शारजाहमध्ये होत आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article