UGC चेअरमनने दिली माहिती
नवी दिल्ली (UGC Graduation) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 ची अंमलबजावणी करण्यासाठी IIT मद्रास येथे एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात यूजीसीच्या अध्यक्षांसह अनेक संस्थांमधील शिक्षणतज्ज्ञांनी (Educationist) सहभाग घेतला. येथे लवकरच पदवी पूर्ण करण्याच्या पर्यायांवर चर्चा करण्यात आली आहे. या संदर्भातील सविस्तर अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे.
यापुढे विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण (Teaching) पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागणार नाही. विद्यार्थ्यांची इच्छा असेल तर ते अडीच वर्षांत पदवीचे शिक्षण (Degree) पूर्ण करू शकतात. यूजीसी अध्यक्ष म्हणाले की, शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना पदवी जलद पूर्ण करण्यासाठी पर्यायांवर विचार करत आहे. या क्रमाने, विद्यार्थ्यांना तीन वर्षांचा अभ्यासक्रम अडीच वर्षांत आणि चार वर्षांचा अभ्यासक्रम तीन वर्षांत पूर्ण करण्याची मुभा असेल. तसेच पुढील शैक्षणिक सत्रापासून त्याची अंमलबजावणी करण्याचे नियोजन केले जात आहे.
शिक्षण परवडणारे बनविण्याची जबाबदारी उच्च शिक्षण संस्थांवर
पुढे ते म्हणाले, ‘येत्या वर्षांत जे विद्यार्थी (Student) सक्षम आहेत ते कमी कालावधीत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. अशा विद्यार्थ्यांना सहा महिने ते एक वर्षापर्यंत फायदा होऊ शकतो असा आमचा अंदाज आहे. तथापि, यूजीसी अध्यक्षांनी (UGC chairman) असेही सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ घ्यायचा आहे त्यांना ते दिले जाईल. तसेच त्यांना त्यांच्या अभ्यासक्रमादरम्यान ब्रेक घेण्याची परवानगी दिली जाणार आहे.
ही योजना आयआयटी मद्रासचे संचालक व्ही कामकोटी यांनी केलेल्या शिफारशीवर आधारित आहे. यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जारी केली जातील, असे यूजीसीचे अध्यक्ष म्हणाले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 लागू करण्यासाठी IIT मद्रास येथे एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात यूजीसीच्या अध्यक्षांसह अनेक संस्थांमधील शिक्षणतज्ज्ञांनी सहभाग घेतला. नवीन शैक्षणिक धोरणाबाबत बोलताना यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार (Jagdish kumar) म्हणाले की, यामुळे शिक्षण व्यवस्थेत बदल होणार असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. शिक्षण परवडणारे बनविण्याची जबाबदारी उच्च शिक्षण संस्थांवर (HEIs) आहे. याशिवाय UGC NET डिसेंबर परीक्षेसाठी लवकरच अधिसूचना जारी केली जाऊ शकते. परीक्षेची अधिसूचना जारी करून येत्या काही दिवसांत अर्ज प्रक्रिया सुरू केली जाण्याची शक्यता आहे.