Video : केएल राहुलने पहिल्याच दिवशी काढला वचपा, ऑस्ट्रेलियन संघाने डोक्यावर मारला हात

5 hours ago 1

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामन्याचा पहिला दिवस पार पडला. पहिल्या दिवसअखेर भारतीय गोलंदाजांची कमाल दिसली. ऑस्ट्रेलियाने 150 धावांचा पाठलाग करताना 7 गडी गमवून 67 धावा केल्या आहेत. तर अजूनही भारताकडे 83 धावांची आघाडी आहे. या सामन्यात केएल राहुलची विकेट आणि त्याने पकडलेल्या कॅचची चर्चा राहिली.

 केएल राहुलने पहिल्याच दिवशी काढला वचपा, ऑस्ट्रेलियन संघाने डोक्यावर मारला हात

Image Credit source: BCCI

| Updated on: Nov 22, 2024 | 5:52 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुर आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये होत आहे. पहिल्याच दिवशी या कसोटीत जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. एका दिवसात 17 विकेट पडल्या आहेत. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने सर्वगडी बाद 150 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 7 गडी गमवून 67 धावा केल्या आहेत. अजूनही भारताकडे 83 धावांची आघाडी असून दुसऱ्या दिवशी तीन विकेट झटपट बाद करण्याची संधी आहे. पहिल्या दिवशी केएल राहुल चर्चेत राहिला. खरं तर फलंदाजी करताना त्याची विकेट चर्चेचा विषय ठरली. बाद की नाबाद ही चर्चा रंगली. केएल राहुलने 74 चेंडूत 26 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने केएल राहुलच्या विकेटसाठी डीआरएस रिव्ह्यू घेतला होता. त्याच्या बॅट जवळून चेंडू गेला होता मात्र स्निकोमीटरमध्ये हालचाल झाल्याचं दाखवण्यात आलं. मग काय टीव्ही अंपायरने ऑन फिल्ड अम्पायरचा निर्णय बदलून आऊट दिला. त्यामुळे केएल राहुल निराश होता.

फलंदाजीसाठी ऑस्ट्रेलिया संघ वेगळ्याच तोऱ्यात होता. पण कर्णधार जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाचा कणाच मोडून टाकला. 31 धावांवर ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमववले होते. त्यामुळे मिचेल मार्श सांभाळून खेळत होता. तेव्हा मोहम्मद सिराजच्या हाती चेंडू सोपवला. सिराजने टाकलेला चेंडूने उसळी घेतली आणि वेगाने आऊटस्विंग होत बाहेर निघाला. तेव्हा मार्शच्या बॅटचा किनारा लागून तिसऱ्या आणि दुसऱ्या स्लिपच्या मध्ये गेला. तेव्हा केएल राहुलने पुढे उडी करून चेंडूचा टप्पा पडण्याआधीच झेल पकडला. पण मैदानी पंचांनी बाद की नाबादसाठी टीव्ही अंपायरकडे दाद मागितली.

*16.5*

🅦

*💥Siraj to Mitchell Marsh, retired Caught by Rahul!! Edged and gone! Superb drawback from Rahul . Mitchell Marsh c Rahul b Siraj 6(19) [4s-1]🎯🎳*#INDvsAUS #BGT2024

*_🎥 (THE CRICKET ARMY) 🔰_* pic.twitter.com/qiYWqYfvUe

— 😂Aloo Gobi khaoge babu 😂 (@SalmanKhan64137) November 22, 2024

तिसऱ्या पंचांनी झेल वारंवार तपासला. वेगवेगळ्या अँगलने तपासून अखेर तिसऱ्या पंचांनी मार्श बाद असल्याचा निर्णय दिला. यानंतर सोशल मीडियावर केएल राहुलने आपल्या विकेटचा वचपा काढल्याची चर्चा रंगली आहे. कारण मार्श बाद की नाबाद यासाठी तिसऱ्या पंचांकडे जावं लागलं. तसं पाहिलं तर हा निर्णय देखील कठीण होता. पण पंचांनी हा निर्णय भारताच्या पारड्यात टाकला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article