अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजपला सोडचिट्ठी:शरद पवार गटात करणार प्रवेश, मोहोळचे नेते लक्ष्मण ढोबळेंची घोषणा

2 hours ago 1
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. आता मोहोळमधील भापज नेते लक्ष्मण ढोबळे हातात तुतारी घेणार आहे. अजित पवार यांच्या त्रासाला कंटाळून शरद पवार गटात जात असल्याचे ढोबळे यांनी सांगितले. मी दोन दिवसांत भाजपला राजीनामा पाठवून देतोय, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून अनेक इच्छुक नेते संधीसाठी पक्षांतर करत आहेत. भाजमध्ये असलेले लक्ष्मण ढोबळे हे सुद्धा मोहोळ मतदारसंघातून विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विठ्ठल माने हे मोहोळचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात ही जागा अजित पवार गटाला सुटणार असल्याने लक्ष्मण ढोबळे यांनी संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे लक्ष्मण ढोबळे यांनी भाजपला सोडचिट्ठी देत तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. लक्ष्मण ढोबळे गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांची भेट सुद्धा घेतली. काय म्हणाले लक्ष्मण ढोबळे? अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून मी राष्ट्रवादी सोडली आणि भाजपमध्ये आलो. पण आता अजित पवारही भाजपसोबत आले आणि पुन्हा त्रास देऊ लागले. अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून आता पुन्हा भाजप सोडत असल्याचे लक्ष्मण ढोबळे म्हणाले. पैशांच्या जीवावर राजकारण करता येते, असे अजित पवारांना वाटते. मात्र तसे होत नाही. तुमच्या काकांनी कसे राजकारण केले ते पहा, असा सल्ला लक्ष्मण ढोबळे यांनी अजित पवारांना दिला आहे. ...तरीही राष्ट्रवादी प्रवेश नक्की मी दोन दिवसांमध्ये माझा राजीनामा भाजपला पाठवून देणार असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले. मला मोहोळ मतदारसंघातून उमेदवारी नाही मिळाली तरी चालेल, पण आता राष्ट्रवादी प्रवेश नक्की आहे, असेही ते एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. लक्ष्मण ढोबळे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता पुन्हा ते राष्ट्रवादीत घरवापसी करणार आहेत. शरद पवारांकडे नेत्यांची रांग विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. भाजपचे हर्षवर्धन पाटील, अजित पवार गटाचे दीपक चव्हाण बबन तसेच फलटण येथील निंबाळकर गटाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नुकताच प्रवेश केला आहे. तर माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे ते देखील तुतारी फुंकण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे यश पाहता लोकांचा शरद पवारांवर विश्वास वाढला असे, पक्षाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article