अज्ञात वाहनाने दोन वर्षीय चिमुकल्याला चिरडलेFile Photo
Published on
:
17 Oct 2024, 6:19 pm
Updated on
:
17 Oct 2024, 6:19 pm
वाडा : वाडा शहराला लागूनच असलेल्या कादिवली येथील एका चिमुकल्याला भरधाव वाहनाने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.17) सायंकाळी 7. 30 च्या सुमारास घडली. गुरुनाथ बाळू वाघ (वय.2) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. या अज्ञात वाहनाचा पोलिसांकडून तपास केला जात असून त्या विरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
गुरुनाथ हा कांदिवली येथील तो रहिवासी होता. भरधाव जात असलेल्या अज्ञात वाहनाने संध्याकाळी 7.30 च्या सुमारास या चिमुकल्याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. काळया रंगाची चारचाकी गाडी असल्याचा काही स्थानिकांनी संशय व्यक्त केला असून अपघाताच्या नंतर हा वाहनचालक फरार झाला आहे. या घटनेचा वाडा पोलीस तपास करीत असून पोलिसांनी या वाहन चालकाच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी केली जात आहे.