अमोल मिटकरींना शरद पवार गटाची ऑफर:मिटकरी म्हणाले- अजितदादांसमोर सर्व ऑफर शून्य, मरेपर्यंत साथ सोडणार नाही

6 days ago 4
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असलेले आमदार अमोल मिटकरी यांना शरद पवार गटाकडून पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे. शरद पवारांच्या पक्षातील एका बड्या नेत्याने ही ऑफर दिल्याचे सांगण्यात येत आहे. तर या वृत्ताला स्वतः अमोल मिटकरी यांनी दुजोरा दिला आहे. पक्षप्रवेशाच्या ऑफरबाबत बोलतांना मिटकरी म्हणाले की, मला माझ्या पक्षात कुठलीही अडचण नसून माझ्यासारख्या छोट्या माणसाला या पक्षाने खूप काही दिले आहे. तसेही, अजितदादांसमोर मला सर्व ऑफर या शून्य आहेत. तसेच, मरेपर्यंत मी अजित पवारांची साथ सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. अजितदादांसमोर सर्व ऑफर शून्य- मिटकरी अमोल मिटकरी यांना प्रसार माध्यमांनी शरद पवार गटाच्या ऑफरबाबत विचारले असता मिटकरी म्हणाले की, याबाबत तथ्य आहे. पण काही जणांशी सौजन्याचे नाते असल्यामुळं काही गोष्टी बोलता येत नाही. याबाबत मी आमच्या सर्व नेत्यांना कळवल्याचेही त्यांनी सांगितले. अजित पवार यांनी माझ्यासारख्या छोट्या समुहातील, सामान्य कुटुंबातील व्यक्तीला मोठे पद दिले आहे. त्यामुळे त्या नेत्याच्या विचाराशी मी कधीही प्रतारणा करणार नाही. अजितदादा यांच्यासमोर सर्व ऑफर शून्य आहेत. अजितदादांकडे बघूनच आम्ही पक्षात आलो आहोत. आमच्या पुढच्या सात पिढ्यादेखील अजितदादांच्या उपकारातून मुक्त होऊ शकत नाही. आमदार अमोल मिटकरींनी शरद पवार गटाची ऑफर विनम्रपणे नाकारली आहे. आपल्या सात पिढ्या अजित पवारांच्या ऋणातून उतराई होणार नसल्याचे अमोल मिटकरी म्हणाले. मरेपर्यंत अजित पवारांची साथ सोडणार नाही- मिटकरी मिटकरी म्हणाले की, शरद पवार गटातील सबंधित मोठ्या नेत्याला मी सांगितलं होतं की, मला माझ्या पक्षापेक्षा दुसरा कोणताही पक्ष मोठा नाही. तसेच, माझ्या नेत्यापेक्षा दुसरा कोणताच नेता मला मोठा नाही आणि तो नेता म्हणजे अजितदादा पवार. मी मरेपर्यंत अजित पवार यांची साथ सोडणार नसल्याचेही मिटकरी यांनी यावेळी सांगितले. मला पक्ष सोडण्याची गरज नाही ते पुढे म्हणाले- तुम्ही एका चळवळीतून आला आहात. आज तुम्ही शांत आहात. कोणत्याही ठिकाणी भाषण करत नाहीत. त्यामुळे तुम्ही आमच्या पक्षात या. आमचे स्टेज तुमच्यासाठी खुले आहे. आमच्या पक्षात तुम्हाला खुली बॅटिंग करण्याची संधी असल्याचे शरद पवार गटाच्या नेत्याने सांगितले. त्यांना मी सांगितले, मला आमच्या पक्षात कुठलीही अडचण नाही. मी खुल्या मनाने पक्षात माझी भूमिका मांडत असतो. या पक्षाने मला मंत्रीपद, आमदारकी सर्वकाही दिले आहे. तसाही मला याचा मोह नसल्याचेही मिटकरी यांनी सांगितले. सत्तेचा ताम्रपट घेवून कोणीही जन्माला आला नसल्याचे मिटकरी म्हणाले. एकवेळी जीव देऊ पण अजित पवार यांच्याशी गद्दारी करणार नसल्याचे मिटकरी म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article