आता मी जगणार नाही!:छातीत गोळ्या लागल्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या तोंडातून निघाले होते शब्द; वाचा त्या दिवशीचा घटनाक्रम

1 day ago 2
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. मारेकऱ्यांनी त्यांच्यावर एकूण 6 गोळ्या झाडल्या. त्यापैकी 3 गोळ्यांनी त्यांचा वेध घेतला. त्यानंतर मला गोळ्या लागल्यात, आता मी वाचणार नाही. माझा मृत्यू होईल, असे ते म्हणाले. निकटवर्तीयांच्या मते, हेच त्यांचे अखेरचे शब्द होते. बाबा सिद्दीकी यांची गत 12 ऑक्टोबर रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना घडली त्या दिवशी विजयादशमी होती. बाबा सिद्दीकी वांद्रे येथील खेरवाडी जंक्शन येथील आपले सुपुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयातून बाहेर पडत होते. त्यावेळी तेथून देवीच्या मूर्ती वाजतगाजत विसर्जनासाठी जात होत्या. त्यावेळी मारेकऱ्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करण्यासाठी या गर्दीत मिसळले होते. त्यांनी या मिरवणुकीत वाटण्यात येणारे सरबतही पिले. त्यानंतर त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर एकूण 6 गोळ्या झाडल्या. त्यापैकी 3 गोळ्या बाबा सिद्दीकी यांच्या थेट छातीत घुसल्या. त्यानंतर गंभीर अवस्थेत त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथेत त्यांचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मला छातीत गोळ्या लागल्यात. त्यामुळे आता मी वाचणार नाही. माझा मृत्यू होईल, असे ते म्हणाले. अजित पवारांच्या पक्षातील एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांचे हेच अखेरचे बोल होते. मुलगा निघून गेला अन् मारेकऱ्यांनी संधी साधली पोलिसांच्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकींची हत्या झाली त्या दिवशी सकाळपासूनच ते घराबाहेर पडले गहोते. ते सकाळी 11 च्या सुमारास झिशान यांच्या कार्यालयात गेले. त्यानंतर या दोघांनी एका स्थानिक कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर सायंकाळी या बाप-लेकांनी कार्यालयातच सायंकाळची नमाज अदा केली. त्यानंतर झिशान हे आपल्या वडिलांना सागून काहीतरी खाद्यपदार्थ आणण्यासाठी चेतना कॉलेजच्या दिशेने गेले. तेव्हा बाबा सिद्दीकी यांनी आपणही काम संपवून 2-3 मिनिटांत निघत असल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी झिशान यांना रविवारी नौपाडा येथील एका कार्यक्रमात भेटण्यास सांगितले. त्यानंतर झिशान सिद्दीकी तेथून निघून गेले. झिशान सिद्दीकी कार्यालयाबाहेर पडल्यानंतर बाबा सिद्दीकी बाहेर आले. तेव्हा देवीच्या मिरवणुकीत सरबत पीत उभे असलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधूंद गोळीबार केला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article