आम्ही आमदारकी पणाला लावून गुवाहटीला गेलो:हे धाडस केले नसते तर तुम्ही सत्तेत आला नसता, त्यागावरून शहाजी बापूंनी भाजपला सुनावले

1 day ago 1
शंभरपेक्षा जास्त आमदार असताना भाजपने मुख्यंमत्रिपदाचा त्याग केला आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना उद्देशून केले होते. त्याला आता 'काय झाडी, काय डोंगार' फेम सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही धाडस केले नसते तर तुमच्या त्यागाला काय महत्व होते, अशा शब्दांत शहाजी बापू पाटील यांनी भाजपला सुनावले आहे. आम्ही आमची आमदारकी पणाला लावली, असेही ते म्हणाले. भारतीय जनता पक्षाने त्याग केला हा मुद्दा खरा आहे. पण आम्ही धाडक केले नसते तर तुमच्या त्यागाला काय महत्व असते? असा सवालही शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. आम्ही आमच्या आमदारकी पणाला लावून गुवाहटीला गेलो होतो. हे धाडस आम्ही केले नसते तर भाजप सत्तेत आली नसती. देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी आम्ही गुवाहटीला गेलो होतो, असे पलटवार शहाजी बापू पाटील यांनी केला. संजय राऊतांच्या टीकेलाही दिले उत्तर संजय राऊत यांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढल्यावरुन टीका केली होती. यावरही आमदार पाटील यांनी भाष्य केले आहे. न्याय हा उघड्या डोळ्यांनी करायचा असतो. न्यायदेवतेच्या हातात आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान दिले आहे, असे उत्तर पाटील यांनी राऊत यांच्या टीकेला दिले आहे. विखे आणि सामंत यांच्या जरांगे भेटीवर केले भाष्य शहाजी बापू पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत यांच्या मनोज जरांगे भेटीवर देखील भाष्य केले आहे. जरांगे पाटील यांना पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या भेटींमध्ये सकारात्मक चर्चा झाली असेल, असा विश्वास शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला. महायुतीत कुरबुरी वाढण्याची शक्यता दिल्ली येथे महायुतीची जागावाटपाची चर्चा सुरू असतात गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून वक्तव्य केले होते. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिले. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला. त्यामुळे जागावाटपात मित्रपक्षांना झुकते माप द्या, असे अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला होता. अमित शहांच्या या त्यागाच्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे या त्यागाच्या मुद्द्यावरुन ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत विशेषत: भाजप आणि शिवसेना शिंदे गटात कुरबुरी वाढण्याची शक्यता आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article