आरक्षण, संविधान विरोधकांनी देश देशोधडीला लावण्याचे षडयंत्र चालवले:जगन सोनवणे यांचा आरोप, मलकापूर येथे संविधान क्रांती परिषद यशस्वी

1 hour ago 1
आज देशात आरक्षण व संविधान विरोधकांनी देश देशोधडीला लावण्याचे षडयंत्र चालवले आहे. जाती-जातीमध्ये विष पसरवून तेढ निर्माण करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत, असा आरोप संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांनी केला आहे. संविधान बचाव, आरक्षण बचाव राज्यव्यापी अभियान अंतर्गत संविधान क्रांती विभागीय परिषदेचे आयोजन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात रविवार २९ सप्टेंबर रोजी संविधान आर्मीचे विदर्भ अध्यक्ष भिवा चोपडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी आर.एन.वानखेडे गुरूजी हे होते. तर उद्घाटक म्हणून संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांनी ऑनलाइन पध्दतीने या परिषदेचे उद्घाटन केले. याप्रसंगी संविधान आर्मीचे विदर्भ अध्यक्ष व संविधान रक्षक सैनिक भिवा चोपडे, जिल्हाध्यक्ष शेख युनूस कुरेशी, शेगाव तालुकाध्यक्ष कमलाकर शेगोकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्वप्रथम संविधान निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे बोलताना ते म्हणाले की, देशात महागाई, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असतानाही त्याकडे लक्ष केंद्रीत करण्याऐवजी चुकीच्या बाबींना थारा देत जनतेला भुरळ पाडण्याचे काम करण्यात येत आहे. याला थांबवण्याची आता वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर विदर्भ अध्यक्ष भिवा चोपडे यांनी आपले विचार व्यक्त केले. संविधान क्रांती विभागीय परिषदेला लहानू फुलपगारे, रवि वाकोडे, विजय तायडे, गणेश इंगळे, रितेश इंगळे, युवराज जाधव, रवि इंगळे, श्याम चोपडे, असित इंगळे यांच्यासह संविधान रक्षक, संविधानवादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रवी वाकोडे यांनी तर आभार प्रदर्शन लहानु फुलपगारे यांनी केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article